www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे `देढ इश्किया` या चित्रपटात त्यांच्यासोबत `तो` सीन करताना मी कावरीबावरी झाले, अशी कबुली `धक धक` गर्ल माधुरी दीक्षित हिने दिली आहे.
नसरुद्दीन शहा आणि माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेल्या `देढ इश्किया` चित्रपटाच्या प्रोमोदरम्यान आज माधुरी दीक्षित बोलत होती. नसरुद्दीन यांच्याबरोबर भुमिका करताना मी नाखूश नव्हते; परंतु त्यांची देहबोली, नजरेत नजर घालून बघणे ही त्यांची नैसर्गिक कला असल्याचे माधुरी म्हणाली.
`देढ इश्किया` मध्ये आपण चांगली भूमिका साकारण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात आनंद लुटल्याचे माधुरीने नमूद केले.
पाहा धम्माल ट्रेलर
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहाः देढ इश्किया’चा ‘हॉट' ट्रेलर