बीग बॉस : अजय स्वत:बद्दलच साशंक

`बीग बॉस`च्या गेल्या चार पर्वांत सर्वांच्या नजरेत भरून राहिलेला बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान `बीग बॉस`च्या या पर्वात मात्र दिसणार नाही. त्याच्याऐवजी ही जबाबदारी पार पाडणार आहे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2014, 05:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`बीग बॉस`च्या गेल्या चार पर्वांत सर्वांच्या नजरेत भरून राहिलेला बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान `बीग बॉस`च्या या पर्वात मात्र दिसणार नाही. त्याच्याऐवजी ही जबाबदारी पार पाडणार आहे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण... असं म्हटलं जातंय.
पण, ही जबाबदारी आपण योग्य पद्धतीनं पेलवू शकतो की नाही? याबाबत खुद्द अजयलाच शंका आहे. गेल्या चारही सत्रांत सलमाननं आपल्या दबंग स्टाईलनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. परंतु, `बीग बॉस`च्या आठव्या सत्रात मात्र तो आपल्याला दिसण्याची शक्यता कमीच आहे.
संधी मिळाली तर बीग बॉस होस्ट करायला आवडेल का? असं जेव्हा अजयला विचारलं गेलं तेव्हा मात्र आणखीनच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करत `मला खरंच माहित नाही. मी आत्ताच यावर काहीही बोलू शकत नाही. सलमाननं हा शो खूपच सुंदर रीतिनं हाताळला होता... त्यावरून नजरा हलत नव्हत्या. मला माहित नाही की मी सलमानप्रमाणे हा शो सांभाळू शकेन किंवा नाही. मी या कार्यक्रमाचे सगळे भाग पाहिले नाहीत पण थोडे फार नक्कीच पाहिलेत` असं अजयनं म्हटलंय.
सलमान खान आणि अजय देवगन एकमेकांचे प्रतिस्पर्धीही समजले जातात परंतु दोघांत खूप चांगली मैत्रीही आहे. दोघांनी `हम दिल दे चुके सनम` आणि `लंडन ड्रीम` या सिनेमांत एकत्र कामही केलंय.
दोन प्रतिस्पर्धी एकमेकांचे चांगले मित्र असू शकत नाहीत यावर माझा विश्वास नाही. सलमान आणि संजय दत्त माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही एकमेकांच्या सेटवरही भेटायला जातो आणि आम्हाला जेव्हाही गरज भासते आम्ही एकमेकांसाठी उभेही राहतो, असंही अजयनं यावेळी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.