संजयची ‘मॅनेजमेंट’ इथं मात्र कमी पडली...
संजयनं त्याच्या मालमत्तेच्या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी मान्यताकडे सोपवलीय तर त्याच्याकडच्या स्टाफलाही नोकरी मिळेल, याचीही खबरदारी घेतलीय.
संजयचा ‘सरेंडर प्लान’
शरणागतीसाठी संजूबाबाचा सरेंडर प्लान तयार आहे. मुंबईच्या पाली हिल इथल्या त्याच्या घरापासून येरवडा जेलपर्यंतचा प्लान कसा असेल… पाहुयात...
...अशी असेल संजयची तुरुंगातील लाईफस्टाईल!
संजय कोणत्या कारागृहात जाणार याचाही फैसला आज टाडा कोर्ट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येरवडा जेलमध्ये संजय दत्तला हलवण्याची तयारी सुरू आहे. संजयला तुरुंगातील बिल्लाही मिळालाय.
संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी!
सिनेअभिनेता संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आर्थर रोड जेलला जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र मिळाले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विनोद लोखंडे यांनी दिली.
संजय दत्त कोर्टातच शरण जाणार
अभिनेता संजय दत्तनं येरव़डा जेलमध्ये शरणागतीची परवानगी मागणारा केलेला अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं उद्या संजय दत्तला टाडा कोर्टासमोरच शरण यावं लागणार आहे.
संजय दत्त `येरवड्यासाठी टाडा`मध्ये
संजय दत्तच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे... सुप्रीम कोर्टानं शरण येण्यासाठी दिलेली ४ आठवड्यांची मुदत उद्या संपते आहे.
संजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश
अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
संजय दत्तची दोन दिवसात `जेलवारी नक्की`
संजय दत्तच्या आगामी सिनेमातील निर्मात्यांनी संजय दत्तसाठी दाखल केलेली मुदतवाढ याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीये
संजय दत्तची याचिका फेटाळली, जेलवारी नक्की...
संजय दत्तची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळं संजय दत्तची जेलवारी पक्की झाली आहे. त्याला येत्या १५ मे ला जेलमध्ये जावेच लागणार आहे.
संजय दत्तला दिलासा मिळणार?
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनवली आहे. यावर संजय दत्तनं दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
संजय दत्तची 'रेकॉर्ड'ब्रेक पोलिसगिरी...
सध्या संजयच्या कामात भलताच परिणाम दिसून येतोय. घेतलेली कामं पूर्ण करण्यासाठी संजय दिवस-रात्र एक करतोय.
मुंबई कोर्टाने जारी केला संजय दत्तचा अटक वॉरंट
शकील नुरानी धमकावल्याप्रकरणी संजय दत्तला अंधेरी कोर्टानं जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी अंधेरी कोर्टानं संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल होतं.
संजय दत्तचा ढोंगीपणा, पुन्हा पुनर्विचार याचिका
अभिनेता संजय दत्तचा ढोंगीपणा आता पुढे येत आहे. संजय दत्तने शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
यापुढे संजय दत्त सोबत काम करणार नाही- नाना
संजय दत्त याच्यावर अभिनेता नाना पाटेकरांनी टीका केली आहे. संजयसोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही, हीच माझ्या परीनं दिलेली शिक्षा असेल, असं नाना म्हणाला.
संजय दत्तच्या सिनेमांचे भविष्य टांगणीला
संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांचा दिलासा दिल्यानंतर बॉलीवुडच्या निर्मात्यांनी आनंद व्यक्त केलाय. याबाबत पोलीसगिरी चित्रपटाचे निर्माते राहुल अगरवाल यांनी संजयला मिळालेल्या दिलासाबाबत खूश असल्याचे म्हटलंय. मात्र, काही चित्रपट पूर्ण होऊ शकतात तर सहा सिनेमांचे भविष्य टांगणीला आहे.
संजय दत्तला दिलासा, ४ आठवड्यांची मुदतवाढ
अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. संजय दत्तने मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती.
संजय दत्तच्या याचिकेचा बुधवारी फैसला
अभिनेता संजय दत्त याने शिक्षा भोगण्यासाठी शरण यायला अवधी मिळावा यासाठी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी आज होणार होती. ती टळली. आता या याचिकेवर उद्या (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
संजूबाबा मागतोय सहा महिन्यांची मुदतवाढ
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या संजय दत्तनं शरणागतीची मुदत वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
संजय दत्तचा ढोंगीपणा उघड, पुनर्विचार याचिकेची शक्यता
सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय दत्त पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत ही याचिका दाखल करणार आहे. संजय दत्तनं शिक्षेविरोधात याचिका दाखल करणार नसल्याचं संजय म्हणाला होता.
‘घनचक्कर’ला संजूबाबाचा अलविदा...
मुंबई सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर संजय दत्तला लवकरच तुरुंगात जावं लागणार आहे. संजयला पाच वर्षांसाठी तुरुंगात जावं लागणार, हे समजल्यानंतर मात्र संजूबाबा काम करत असलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शकांचे धाबे दणाणले. मात्र, इतर सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी संजयनं ‘घनचक्कर’ला टाटा केलंय.