संजय दत्तचा ढोंगीपणा, पुन्हा पुनर्विचार याचिका

अभिनेता संजय दत्तचा ढोंगीपणा आता पुढे येत आहे. संजय दत्तने शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2013, 10:51 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

अभिनेता संजय दत्तचा ढोंगीपणा आता पुढे येत आहे. संजय दत्तने शिक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आपल्याला झालेल्या शिक्षेसंदर्भात पुनर्विचार व्हावा, अशी विनंती संजयनं कोर्टात याचिकेद्वारे केली आहे. नुकताचं संजयला शरणागतीसाठी चार आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
मुदतवाढीबाबत संजय दत्तच्या या याचिकेवर कोर्टाने संजय दत्तच्या बाजूने निकाल दिला आहे. संजय दत्तने ६ महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र संजय दत्तला कोर्टाने शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

संजय दत्तला आपल्या सिनेमाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण करण्यास वेळ हवा असल्याने त्याने कोर्टाकडे ही मुदतवाढ मागून घेतली होती. संजय दत्तला हा फार मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी जेव्हा संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर चार आठवड्यात त्याला शरण यायचे होते. मात्र आता पुन्हा एकदा त्याला चार आठवड्याची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा दिलासा मिळाल्याने आता जवळजवळ महिन्याभराने संजय दत्तला पोलिसांना शरण जावं लागणार आहे.