www.24taas.com,नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आज गुरुवारी आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांना खूश करण्यात आलेत. लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणे महिला बँक सुरू करण्यात आलेय. महिलांनी महिलांसाठी चालविलेली बँक म्हणजे महिला बँक, असेच या बँकेचे धोरण असणार आहे.
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सर्वसामान्य नागरिकांना थोडासाच दिलासा देणारा असला तर महिला वर्गाला खूश करणारा अर्थसंकल्प आहे.
देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे. ही बँक ऑक्टोबर २०१४ पर्यंत सुरू होणार आहे. या बँकेतील सर्व व्यवहार हे महिला कर्मचारी करणार आहेत. महिलांसाठी सुरू होणाऱ्या बँकेत फक्तच महिलांनाच खाते उघडण्यात येईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला बँक स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
महिलांसाठीच्या उद्योगांसाठी या बँकेतून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. महिलांसाठी १ हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करताना सरकारी बँकांसाठी १४ हजार कोटी रूपये देण्याचे जाहीर केले. सरकारी बँकाच्या सर्व शाखांमध्ये एटीएम मशीन बसविण्यात येणार आहेत.