सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार

( जयवंत पाटील, झी २४ तास ) डिजिटल इंडियाच्या निमित्ताने हा एक विषय समोर आला आहे, विषय तसा प्रत्येक नेटकऱ्याच्या खिशातून सहज पैसे हडपण्याचा आहे. पाकिटमार एटीएम कार्डसारखे प्लास्टिक मनी वाढल्याने कमी झाले असले, तरी काही मोबाईल कंपन्या आता पाकिटमारी करणार आहेत. या पाकिटमारीची तक्रार तुम्हाला थेट टेलिफोन अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे करावी लागणार आहे.

Updated: Sep 28, 2015, 10:22 PM IST
सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार title=

मुंबई : ( जयवंत पाटील, झी २४ तास ) डिजिटल इंडियाच्या निमित्ताने हा एक विषय समोर आला आहे, विषय तसा प्रत्येक नेटकऱ्याच्या खिशातून सहज पैसे हडपण्याचा आहे. पाकिटमार एटीएम कार्डसारखे प्लास्टिक मनी वाढल्याने कमी झाले असले, तरी काही मोबाईल कंपन्या आता पाकिटमारी करणार आहेत. या पाकिटमारीची तक्रार तुम्हाला थेट टेलिफोन अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे करावी लागणार आहे.

मोबाईलसाठी तुम्ही फोर-G चा प्लान घेतला म्हणजे तुमचं नेट कायमच सुसाट धावेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा गैरसमज ठरू शकतो.

पेैसे मोजूनही भारतात स्पीड का नाही

तुम्हाला आठवत असेल, जेव्हा ब्रॉडबॅण्डचा गाजावाजा झाला आणि ब्रॉडबॅण्ड भारतात दाखल झालं, तेव्हा तो स्पीड सर्वाधिक वाटत होता. काही दिवसांनी टू-G नेट आलं, तेव्हा टू-जी वेगवान आहे, असं तुम्हाला भासवण्याचा तर प्रयत्न झाला नाही ना?, कारण नंतर युजर्स वाढल्यानंतर ब्रॉडबॅण्ड आणि टू-G मध्ये तेवढा मोठा फरक दिसला नाही.

बाटली तीच, दारू ही तीच, लेबल वन टू का फोर

टू-G नंतर थ्री-G दाखल झालं, थ्री-G म्हणजे सर्व काही असं सांगत असताना, टू-Gचा स्पीड कमी झाला. थ्रीG जेमेतेम चालतंय आणि त्यात आता फोर-G आणण्याची घाई मोबाईल कंपन्यांनी सुरू केलीय. अनेक वेळा तुम्ही मोबाईल स्क्रीनवर पाहा, थ्रीजी गायब असतं आणि टू-G किंवा ब्रॉडबॅण्डच्या वेगाने कनेक्शन सुरू असतं.

नाव बदलत गेली, वेग तोच, लुटीचा वेग वाढला

नावं बदलत गेली, ब्रॉडबॅण्ड, टू-G, थ्री-G, फोर-G आणि पैसे वाढत गेले, खिसे खाली होत गेले, आणि स्पीड आहे तोच. मग याला पाकिटमारी म्हणायचं नाही तर काय?,  एका खासगी मोबाईल कंपनीच्या गॅलरीत गेलो, मला थ्री-Gचं डोंगल हवं होतं, पण आमच्याकडे फोर-Gचं आहे, थ्री-Gचं सीम कार्ड फोर-Gमध्ये कनव्हर्ट करून देऊ, अशी सूचना वजा सक्ती गॅलरीकडून झाली, गॅलरीच्या पायऱ्या उतरलो, कारण जवळ-जवळ सर्वच मोबाईल कंपन्यांची बिलं कशी येतात याचे अनुभव मित्रांना विचारा, खिसा कापल्या सारखंच वाटेल. उद्या 'एमटीएनएल'कडे जाणार आहे, चालेल एमटीएनएल.. कारण सर्वांची सेवा तशी आता सारखीच आहे, पैसे तर वाचतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.