आषाढ आणि कालिदास

`आषाढस्य प्रथम दिवसे`...आज आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस....आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की आपल्याला आठवण येते ती महाकवी कालिदासाची... आषाढस्य प्रथम दिवसे ही आहे अजरामर अशा कालिदासाच्या मेघदूतम मधील एक काव्यपंक्ती.... त्यामुळं आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 9, 2013, 11:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
`आषाढस्य प्रथम दिवसे`...आज आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस....आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की आपल्याला आठवण येते ती महाकवी कालिदासाची... आषाढस्य प्रथम दिवसे ही आहे अजरामर अशा कालिदासाच्या मेघदूतम मधील एक काव्यपंक्ती.... त्यामुळं आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच... पण तो चित्रकारही होता...एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता.... आषाढ महिन्याचं स्वागत करतांना आपण कालिदासाच्या बहु्आयामी व्यक्तिमत्वाचा हा वेध.
कालिदास म्हणजे होता रससिद्ध कविश्वर... कालिदासानं संस्कृत भाषेत अलौकिक अशी साहित्य रत्न निर्माण केली... मेघदूतम्, ऋतुसंहारम्,अभिज्ञान शांकुतलम्, रघुवंशम्, कुमारसंभवम्, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् अशा सरस कलाकृती त्याच्या प्रतिभेनं आपल्याला दिल्या...जगातलं सौदर्य, निसर्ग, समाज, इतिहास, भूगोल, आध्यात्मिकता या सगळ्यांचा वेध घेणारी प्रतिभा कालिदासाला लाभली होती...असं असलं तरी कालिदास म्हणजे इतिहासातलं एक न उलगडलेलं कोडं ठरलयं.
कालिदास कोण होता ? त्याचा नेमका काळ कुठला ? याबद्दल जाणकारांमध्येही संभ्रम आहे. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक डॉ. पंकज चांदे यांनी विचारलेले काही प्रश्न.
डॉ. चांदे... महान प्रतिभावंत कालिदास नेमका कोण होता, त्याचा काळ कुठला, याबद्दल काय सांगता येईल ?
- कालिदास म्हटलं की आठवते ती, आषाढस्य प्रथम दिवसे ही ओळ...आज आषाढाचा पहिला दिवस आहे... आषाढ महिन्यात सृष्टी मोहरुन जाते आणि आपल्याला होतं ते निसर्गाचं मनोहारी दर्शन.
प्रश्न - डॉ. चांदे काय काय सांगता येईल कालिदास आणि आषाढस्य प्रथम दिवसे या संबंधाबद्दल ?
- कालिदासाचं साहित्य वाचलं की जाणवतं ते त्यातलं सौंदर्य.... पण कालिदासाच्या साहित्यात फक्त तेवढचं नाही तर त्यात भाषाविज्ञान आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, मानसशास्त्र आहे, योगशास्त्र आहे एवढचं काय तर विज्ञानही आहे.... कालिदासाच्या मेघानं मेघदूतमध्ये केलेला प्रवास आजच्या विमानप्रवासाच्या मार्गाशी जुळणारा होता.
प्रश्न - डॉ. चांदे एक साहित्यिक म्हणून कालिदासाचा दर्जा काय होता ? अशी काय जादू कालिदासाच्या लेखणीत होती की त्याची भूरळ अद्यापही कायम आहे ?
- कालिदास कसा दिसत होता याबद्दल कुठलाही पुरावा उपलब्ध नाही..त्यामुळं अनेकांनी कालिदास त्यांच्या प्रतिभेनं साकारला.... कालिदासाचं हे चित्र आता आपण पाहतो आहोत ते आहे इंदुरच्या देवकृष्ण जटाशंकर जोशी उर्फ डी. जे. जोशी यांच्या प्रतिभेतून साकारलेलं... कालिदासाच्या व्यक्तिमत्वाचं वलय, त्याची प्रतिभावंत प्रज्ञा, त्याचं निसर्गप्रेम, सह्दय कोमलता, त्याचा राजदरबारी असलेला वावर, त्याची आध्यात्मिकता असं सगळं काही या चित्रामधून जाणवतं... भारतीय आणि पाश्चिमात्य कलाशैलींचा सुरेख संगम या चित्रामध्ये पाहायला मिळतो.

महाकवी कालिदासाची मोहिनी सतत वाढतच आहे.. कालिदास म्हणजे होता एक प्रेरणेचा स्त्रोत... कालिदासापासून प्रेरित होत कुणी साहित्यकृती निर्माण केल्या, कुणी शिल्प कोरली तर कुणी कुंचल्यातून नवं विश्व उभं केलं.. असाच एक कलावंत.. ज्यानं कालिदासाचाचं प्रतिभाविश्व आपल्या सर्जनशिलतेनं कुंचल्याव्दारे साकारलं... या कलावंताचं नाव आहे विख्यात चित्रकार वासुदेव कामत.
चित्रकार वासुदेव कामत यांना अशीच भुरळ घातली ती कालिदासाच्या अभिज्ञान शांकुतलम् या नाटकानं.. शांकुलतपासून प्रेरणा घेत कामत यांनी आपल्या कुंचल्यानं कालिदासाची प्रतिभासृष्टीच जणू आपल्यासमोर खूली केलीय. चित्रकार वासुदेव कामत यांनी भुरळ घातली ती महाकवी कालिदासाच्या व्यक्तीमत्वानं... कालिदास कसा असेल याचं चित्र त्यांनी रेषाटलं ते आपल्या प्रतिभेनं. जणू कालिदास त्यांनी आपल्यासमोर चिक्षातून जिवंत केलाय. अंगाखांद्यावर चैतन्य खेळवत आषाढ महिना सुरु झालाय... अशा या चैतन्यानं रसरसलेल्या आषाढ महिन्याचा पहिला दिवस महाकवी कालिदासाचं स्मरण करत आपण साजरा केला.
# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
# झी २४ तासला ट्विटर