तुम्हालाही आपल्या घरात प्राणी पाळण्याचा छंद आहे?

अनेक जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी - पक्षी पाळण्याचा छंद असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की कोणते प्राणी घरात पाळणं शुभ असतं... आणि कोणते प्राणी घरात पाळणं अशुभ ठरतं ते... 

Updated: Jun 8, 2016, 11:15 AM IST
तुम्हालाही आपल्या घरात प्राणी पाळण्याचा छंद आहे? title=

नवी दिल्ली : अनेक जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी - पक्षी पाळण्याचा छंद असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की कोणते प्राणी घरात पाळणं शुभ असतं... आणि कोणते प्राणी घरात पाळणं अशुभ ठरतं ते... 

पाहा, यापैंकी कोणता प्राणी - पक्षी तुमच्या घरात आहे का? आणि असेल तर तो तुमच्यासाठी शुभ ठरणार का?

कुत्रा

कुत्रा घरात असणं हे वैभवाचं लक्षण आहे. कुत्र्यांचा घरात वावर असल्यानं सकारात्मक ऊर्जेचा वापर घरात असतो.

बेडूक 

वास्तुशास्त्रानुसार जर घरात बेडूक ठेवणं शुभ मानलं जातं... त्यामुळे अनेक जण आपल्या घरात बेडकाचं प्रतिक म्हणून पीतळेचं बेडूक ठेवतात. घरात बेडुक असेल तर तुम्ही आजारापासून दूर राहता. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वी बेडकाचं दर्शन घेऊन जाणं, शुभकारी ठरतं. 

घोडा

वास्तुशास्त्रानुसार घोडा हे ऐश्वर्याचं प्रतिक आहे. अशामध्ये घोडा किंवा घोड्याचं प्रतिक घरात ठेवणं शुभ असतं. 

कासव

ज्योतिष शास्त्रानुसार कासव घरात ठेवणं शुभ असतं. त्याला लक्ष्मीचा प्रतिनिधी मानलं जातं. घरात तांब्याचं कासव ठेवल्यानं वैभव प्राप्ती होते, असं मानलं जातं. 

मासा

चायनीज वास्तुशास्त्रानुसार, घरात सोनेरी रंगाचा मासा ठेवणं शुभकारक असतं. घरात मासा ठेवल्यानं घरात शांती राहते, असं मानलं जातं. .

ससा

घरात समृद्धी टिकून राहण्यासाठी ससा लाभदायक ठरतो, असं वास्तुशास्त्रात मानलं जातं. ससा लहान मुलांसाठी शुभकारी ठरतो, असंही म्हटलं जातं.