मुंबई : शास्त्रात वास्तुशास्त्राचे महत्त्व मोठे आहे. जीवनावर काही प्रमाणात वास्तुशास्त्राचा प्रभाव आढळतो. घरात सुखशांती, लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी खालील वास्तुटिप्सचा नक्की अवलंब करा.
१. घरात सकाळच्या वेळी नेहमी भावगीत ऐका.
२. घरात झाडू कधीही उभा ठेवू नका. दिसणार अशा जागी नेहमी झाडू ठेवावा.
३. चपला इतरत्र विखुरलेल्या नसाव्यात.
४. सकाळी ६ ते ८ दरम्यान देवाची पुजा करण्याला प्राधान्य द्यावे.
५. पुजाघरात नेहमी एक पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा.
६. देव्हाऱ्यात धूप, अगरबत्ती, हवन कुंडाची सामग्री दक्षिण पूर्व या ठिकाणी ठेवा.