तुमचाही राक्षसगण आहे का?

आपल्या आसपास अशा अनेक शक्ती असतात ज्या नकारात्मकही असतात तसेच सकारात्मकही ज्या आपण पाहू शकत नाही. मात्र काही लोकांना या शक्ती जाणवतात. ज्यांचा गण राक्षस असतो अशा व्यक्तींना या गोष्टींचा भास होतो. 

Updated: Jun 16, 2016, 03:55 PM IST
तुमचाही राक्षसगण आहे का? title=

मुंबई : आपल्या आसपास अशा अनेक शक्ती असतात ज्या नकारात्मकही असतात तसेच सकारात्मकही ज्या आपण पाहू शकत नाही. मात्र काही लोकांना या शक्ती जाणवतात. ज्यांचा गण राक्षस असतो अशा व्यक्तींना या गोष्टींचा भास होतो. 

ज्योतिशास्त्रानुसार मनुष्य तीन गणांमध्ये विभागला गेलाय. देव, मनुष्य आणि राक्षस. देवगणातील व्यक्ती दानी, बुद्धिमान, साधीभोळी, अल्पाहारी आणि विचारांत श्रेष्ठता असलेली असतात. तर मनुष्यगण असलेल्या व्यक्ती मानी, धनवान, विशाल नेत्र असलेल्या, योग्य निशाणा साधणाऱ्या अशा असतात. 

अशा असतात राक्षस गण असलेल्या व्यक्ती

या व्यक्ती विलक्षण प्रतिभा असलेल्या असतात. यांचा सिक्स सेन्स चांगला असतो. नकारात्मक परिस्थितीतही त्या हार मानत नाहीत. या व्यक्ती साहसी आणि मजबूत इच्छाशक्ती असलेल्या असतात.