www.24taas.com झी मीडिया, मुंबई
भूत असतं की नसतं, याबद्दल कायमच वाद होत असतात. मात्र विविध ग्रंथांमधून भुतांसदर्भात काही संकल्पना देण्यात आल्या आहेत. त्या अगदीच अशास्त्रीय नसल्याचं जाणवतं. या संकल्पनांबद्दल नव्याने अभ्यास केला जात आहे. त्यावरून भूत हे निव्वळ अंधश्रद्धा आहे का, या प्रश्नाची उकल होण्याची शक्यता आहे.
भुतं अंधार, स्मशान, जंगल, झाडं, रिकामी घरं अशा एकांतामध्ये वास करत असल्याचं सांगण्यात येतं. गरुडपुराणात भुतांच्या उत्पत्तीचा उल्लेख आहे. पापी व्यक्तींच्या अतृप्त वासना त्यांना भूतयोनीकडे नेतात. पिंडदानाने आत्मे तृप्त होतात. मात्र मृत्यूनंतर ज्यांच्या वासना पूर्ण झाल्या नसतात, अशांचं मुलांनी पिंडदान करूनही समाधान होत नाही. असे आत्मे यमलोकात जातात. असे अतृप्त आत्मे मुक्तीच्या शोधात वायूरूपात पृथ्वीवरील निर्जन भागात फिरत राहातात.
मानवी शरीर पंचतत्वांपासून बनलं आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांमधून मानव शरीर धारण करतो. मात्र, अंत्यसंस्कारांनंतर सर्व शरीर पंचमहाभुतांमध्ये मिसळून जातं. अतृप्त इच्छा असणारे आत्मे वायूतत्वात मिसळून पृथ्वीवर वास्तव्य करत राहातात. त्यामुळेच वायूरूपात असलेले आत्मे माणसांच्या नजरेला पडत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.