मुंबई : विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...
तूळ आणि सिंह - या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो. लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते.
मेष आणि कुंभ - या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात. हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात.
मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते.
मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात.
वृषभ आणि कर्क - हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.
वृषभ आणि मकर - हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहतात. वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते.
मेष आणि धनू - धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते.
कर्क आणि मीन - ह्या दोन्ही जल तत्वाच्या रास आहेत. या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भावूक असतात. तसेच एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात.
सिंह आणि धनू - या दोन्ही राशीचे लोक पार्टीचे शौकीन असतात. सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो.
कन्या आणि मकर - कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात. पटकन एखाद्यासमोर आपले मन मोकळे करु शकत नाहीत. या वेळेस मकर राशीचे लोक यांच्याप्रती फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात.
सिंह आणि मिथुन - सिंह आणि मिथुन राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात.
वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्याच बाबतीत एक सारखे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.
वृश्चिक आणि कर्क - वृश्चिक आणि कर्क दोघेही जल तत्वाच्या रास आहेत. त्यामुळे या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात. या व्यक्ती संवेदनशील असतात. तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या व्यक्तीशी वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले जमते. मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.
कुंभ आणि मिथुन - या दोन्ही वायुतत्व असणार्या रास आहेत. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.
मिथुन आणि तूळ - या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते.