कृष्णाने चलाखीने महाभारतात घडवले हे ५ वध

मुंबई : चांगले करण्यासाठी असत्याचा वापर करणेही धर्मच आहे, असे म्हटले जाते.

Updated: Feb 22, 2016, 02:13 PM IST
कृष्णाने चलाखीने महाभारतात घडवले हे ५ वध title=

मुंबई : चांगले करण्यासाठी असत्याचा वापर करणेही धर्मच आहे, असे म्हटले जाते. महाभारत आणि त्यात असणारी कृष्णाची भूमिका या दोन गोष्टी त्याचे उत्तम उदाहरण आहेत. कृष्णाने महाभारतात अनेक ठिकाणी काही चलाखी करुन आवश्यक वध घडवून आणले.

भीष्माची हत्या
भीष्मची हत्या करणे अर्जुनाला जमले नसते याची पूर्ण कल्पना कृष्णाला होती. पण, भीष्म कधीही स्त्रीयांवर वार करणार नाहीत हेसुद्धा त्यांना ठावूक होते. म्हणूनच कृष्णाने शिखंडीला भीष्मांसमोर उभे केले. त्या काळातील स्त्रीया युद्ध करत नसत. पण, शिखंडी एक योद्धा असल्याने ती युद्ध करू शकत होती.

द्रोणाचार्यांची हत्या 
द्रोणाचार्य हे सर्वांचेच गुरू होते आणि त्यांची हत्या करणे कठीण काम होते. त्यांचा वध कसा करणार ही सर्वांनाच चिंता होती. म्हणून कृष्णाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध करवून घेतला. अश्वत्थामा हे द्रोणाचार्यांच्या मुलाचेही नाव होते. युद्धात आरोळी उठली की अश्वत्थामा मरण पावला तेव्हा द्रोणाचार्यांना आपला मुलगा मरण पावल्याचे वाटले. त्यांच्या हातातून बाण खाली पडला आणि कृष्णाने त्यांचा वध केला.

जयद्रथाची हत्या
जयद्रथाने अभिमन्यूचा वध केल्यावर अर्जुनाने एका विेशेष धनुष्याने संध्याकाळपर्यंत जयद्रथाचा वध करण्याचा अथवा स्वतःचे प्राण त्यागण्याचा पण केला. सूर्यास्ताच्या आधी जयद्रथ मेला नाही. अर्जुन अग्नीत भस्मसात करण्याची तयारी करू लागल्यावर लपलेला जयद्रथ बाहेर आला. तेवढ्यात कृष्णाने आपल्या हाताने झाकलेल्या सूर्याला मुक्त केले आणि अर्जुनाने जयद्रथाचा वध केला.

अर्जुनाच्या बचावासाठी घटोत्कोचाचा वापर
कर्णाला मारण्यासाठी केवळ अर्जुनच समर्थ असल्याचे कृष्ण जाणत होता. कृष्णाने घटोत्कचाला दुर्योधनावर आक्रमण करण्यास सांगितले. कर्णाने आपली शक्ती आपला मित्र दुर्योधनाला वाचवण्यात लावावी असा कृष्णाचा विचार होता. ही शक्ती वापरल्यास कर्णाच्या वासवा शक्तीचा अंत होईल आणि अर्जुन वाचला जाईल.

कर्णाची हत्या
कर्ण रथात बसला असता अर्जुनाने त्याच्या रथाच्या खालील बाजूवर बाण चालवला. यामुळे रथ जमिनीत रुतला. कर्ण जेव्हा रथ सोडवण्यासाठी खाली उतरला तेव्हा तो निःशस्त्र होता. तेव्हा त्याला विचार करण्याची संधीही न देता अर्जुनाने त्याचा वध केला. ही युक्ती कृष्णाचीच होती.