आज देवशयनी एकादशी: आता चार महिन्यांसाठी भगवान विष्णूंचा विश्राम

देवशयनी एकादशी आज (27) जुलैला आहे. जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आजपासून चार महिन्यांसाठी पाताळात राज बळीकडे आराम करायला जाणार आहेत. 

Updated: Jul 27, 2015, 07:07 PM IST
आज देवशयनी एकादशी: आता चार महिन्यांसाठी भगवान विष्णूंचा विश्राम title=

मुंबई: देवशयनी एकादशी आज (27) जुलैला आहे. जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आजपासून चार महिन्यांसाठी पाताळात राज बळीकडे आराम करायला जाणार आहेत. 

मराठी महिन्यानुसार आषाढ शुक्ल एकादशी तिथीला देवशयनी म्हणजेच हरीशयनी नावानं ओळखलं जातं. श्री हरीविष्णू आज महिन्यांसाठी विश्राम करायला जातात, अशी आख्यायिका आहे. यादरम्यान, मंगलकार्य केले जात नाहीत, वैवाहिक कार्यक्रम नसतात. याकाळात धार्मिक कार्यक्रम केले जातात. 

यासोबतच चातुर्मासाची सुरूवात होते आणि आता पुढील चार महिने सणांचा काळ असतो. ज्योतिषचार्यांनुसार याकाळात देवी-देवता क्षीरसागरात आराम करतात आणि म्हणूनच चार महिने मंगलकार्य न करता देवाची उपासना केली जाते. २२ नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आहे. म्हणजे तुळशी विवाहसोबतच देवी-देवता क्षीरसागरातून आराम करून परततात. 

पंडितांनुसार देवशयनी एकादशीपासून देवउठनी एकादशी दरम्यान कोणतंही मंगलकार्य न करण्याची परंपरा आहे. कारण, याकाळात केलेलं कार्य यशस्वी होत नाही, अशी मान्यता आहे. 

यावर्षी १४ जुलैपासून देवगुरू बृहस्पतिनं सूर्याच्या राशीत सिंहमध्ये प्रवेश केलाय. ज्योतिषशास्त्रात सिंहस्थ गुरूच्या प्रभावातही वैवाहिक आणि शुभकार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. याचा प्रभाव गंगेच्या उत्तरेला आणि गोदावरी नदीच्या दक्षिण क्षेत्रात असतो. ज्योतिषचार्यांनुसार चातुर्मासानंतर वैवाहिक कार्यक्रम सुरू होतात. देवशयनी दरम्यान काही तिथी शुभ मानल्या जातात. त्यात गणेश चतुर्थी, नवरात्रींचा समावेश आहे. यादिवशी साखरपुडा आणि नव्या व्यवसायाची सुरूवात केली जावू शकते.
आज देव झोपणार आहेत. 

पाहा काय म्हणणं आहे पंडितांचं - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.