हे फुल वाहा देवीला.. देवी पावेल तुम्हांला

‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा.

Updated: Oct 19, 2012, 09:01 AM IST

www.24taas.com,
देवाला फूल कोणते वाहतो. यावरदेखील आपल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. ‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा. विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके, म्हणजे त्या देवतेचे कण आकर्षित करण्याची क्षमता इतर फुलांच्या तुलनेत जास्त असते. अशी फुले त्या त्या देवतेच्या मूर्तीला वाहिली, तर ती ती देवतेची मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन त्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो.
त्यामुळे विशिष्ट देवतेला विशिष्ट फूल वहाण्याला महत्त्व आहे. यानुसार पुढील सारणीत काही देवी आणि त्यांना वहावयाची फुले यांची नावे दिली आहेत. सारणीत दिलेल्या त्या त्या फुलाच्या गंधाकडे त्या त्या देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याने त्या त्या गंधाच्या उदबत्त्या वापरल्यामुळेही त्या त्या देवीच्या तत्त्वाचा पूजकाला जास्त लाभ होतो.’
दुर्गा माता - मोगरा

लक्ष्मी माता - झेंडू

सप्तशृंगी माता - कवठी चाफा

शारदा माता - रातराणी

योगेश्‍वरी माता - सोनचाफा

रेणुका माता - बकुळी

वैष्णोदेवी माता - निशिगंध

विंध्यवासिनी माता - कमळ

भवानी माता - भुईकमळ (केशरी रंगाचे भूमीवर येणारे फूल)

अंबा माता - पारिजात