अमावस्येला करा विष्णूची पूजा

श्रीविष्णूची पूजा ही केवळ ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच्यासाठीच असते. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पूजा करणार्‍यावरच होतो.

Updated: Feb 21, 2013, 07:57 AM IST

www.24taas.com
श्रीविष्णूची पूजा ही केवळ ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच्यासाठीच असते. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पूजा करणार्‍यावरच होतो. ही पूजा फक्त अमावस्येलाच होते. प्रत्येक अमावस्येला ही पूजा होत नाही, तर ज्या अमावस्येचे फळ हे प्रकृतिमानाला चांगले असते, अशाच अमावस्या निवडून त्या अमावस्येला ही पूजा करतात. अनेक औषधोपचार करून प्रकृतीत सुधारणा होत नाही किंवा अतिधीम्या गतीने होते.
विवाहामध्ये विविध प्रकारचे अडथळे येत असतील, विवाहयोग लवकर जुळून येत नसतील, घरामध्ये कलह असतील, काही व्यक्तिगत बाबी- ज्या खुले आम बोलता येत नसतील, अशा गोष्टींसाठी ही पूजा करण्यात येते. विवाहसंबंध लवकर न होणे, तसेच विवाह झाल्यावर अकारणच अपत्य न होणे यावर, तसेच सुदृढ आणि चांगल्या शरीरयष्टीचे बालक जन्माला यावे यासाठीदेखील याचा प्रयोग केला जातो. विवाहानंतर सांसारिक सुखाचा अभाव असेल तरीही या पूजेचा उपयोग केला जातो.
कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसणे, तसेच अयोग्य पद्धतीने निर्माण होणार्‍या शारीरिक पीडा, तसेच अन्य प्रश्‍न याच पूजेच्या माध्यमातून हाताळले जातात. चिडचिडा स्वभाव, स्वभावाची अस्थिरता, मनाची अशांतता घालविण्यासाठी या प्रकारच्या पूजेचा अवलंब नाथ शक्तिपीठात होतो. करणी, बाधा आदी प्रकारांनी त्रस्त असलेल्या जीवासाठी नाथ शक्तिपीठातून पूजा केल्या जातात. या पूजेचा परिणाम सर्वांगीण विकासासाठी केला जातो.