वास्तूशास्त्राची ही आठ सूत्रं तुम्हाला करु शकतात सुखी

मुंबई : आपल्या आयुष्यातील असणाऱ्या आनंदासाठी किंवा दुःखासाठी काही अंशी आपली वास्तूही जबाबदार असते.

Updated: Feb 28, 2016, 10:48 AM IST
वास्तूशास्त्राची ही आठ सूत्रं तुम्हाला करु शकतात सुखी title=

मुंबई : आपल्या आयुष्यातील असणाऱ्या आनंदासाठी किंवा दुःखासाठी काही अंशी आपली वास्तूही जबाबदार असते. त्यामुळे शास्त्रात नेमून दिलेल्या वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात काही लाभ होऊ शकतात.

१. झोपताना आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल याची काळजी घ्या. यामुळे कुबेराची कृपा तुमच्यावर राहू शकते. सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे तळवे पाहून देवाचे स्मरण करा.

२. दररोज नित्यनियमाने सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा वापर करा. हे करताना 'आदित्यः नमः' या मंत्राचा जप करा.

३. दररोज आपल्या इष्ट देवतेची किंवा कुलदेवतेची पूजा करा. वेळ असल्यास धूप किंवा दिवा लावून उत्तर दिशेकडे चेहरा ठेवून ध्यान करा.

४. देवांना वाहिलेली फुले किंवा हार सुकून गेल्यावर घरात ठेवू नका. त्यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करा.

५. जेवणासाठी सर्वात चांगली जागा म्हणजे घराचे स्वयंपाकघर. तुमच्या बेडरुममध्ये किंवा घराच्या हॉलमध्ये जेवण घेणे टाळा.

६. जेवण तयार करताना त्यातील पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढून ठेवा.

७. आपल्या घराकडे असलेल्या तुळशीच्या रोपट्याला दररोज पाणी द्या. संध्याकाळच्या वेळेला दिवा दाखवा. यामुळे लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील.

८. सूर्योदयाच्या वेळेला किंवा सूर्यास्ताच्या वेळेला झोपू नका. रात्री अंथरुणात शिरण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा. झोपण्याआधी १० मिनिटे ध्यानधारणा करा. यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.