भविष्यवाणी की शापवाणी

धर्मशास्त्रांमध्ये विश्व विनाश किंवा प्रलया संबंधी अनेकवार उल्लखे सापडतो. या विश्वाचा एक दिवस विनाश होईल असं भाकित अनेक धर्म ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं. कयामतचा दिवस नेमका कधी येईल याविषयीची भविष्यवाणी सापडणं जवळपास असंभव आहे. तरी देखील अशा प्रकारची भविष्यवाणी अनेकवार वाचायला मिळते.

Updated: Dec 12, 2011, 01:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
धर्मशास्त्रांमध्ये विश्व विनाश किंवा प्रलया संबंधी अनेकवार उल्लखे सापडतो. या विश्वाचा एक दिवस विनाश होईल असं भाकित अनेक धर्म ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं. कयामतचा दिवस नेमका कधी येईल याविषयीची भविष्यवाणी सापडणं जवळपास असंभव आहे. तरी देखील अशा प्रकारची भविष्यवाणी अनेकवार वाचायला मिळते. विश्वाची अखेर कशी होईल अशा स्वरुपाच्या अनेक प्रश्नांची उत्तरांचा शोध आजही घेण्यात येत आहे. आजवर अनेकवेळा पृथ्वीच्या विनाशाची भविष्यवाणी करण्यात आली असली तरी दरवेळेस तो एक कल्पना विलास असल्याचं सिद्ध झालं आहे.
इटलीतील माउंट वैसुवियसच्या ज्वालामुखीने रोमन साम्राज्याचा पाया डळमळा होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकाने हजारो लोकांचा मृत्यु झाला आणि पोम्प तसंच हरक्यूलेनियम सारखी शहरे उध्वस्त झाली. ज्वालामुखीने केलेल्या विध्वंसाने लोकांना वाटलं की विश्वाची अखेर समीप आली आहे.

 

ब्रिटनमध्ये १६ व्या शतकात प्लेगने हाहाकार माजवला. सर्वात भयंकर प्लेगची साथ १६६५ मध्ये आला आणि जवळपास संपूर्ण लंडन शहराला साथीचा प्रादुर्भाव झाला. प्लेगच्या भयंकर साथीमुळे लोकांनी भविष्यवाणी केली की पृथ्वीचा विनाश ओढवणार आहे.
हॅलेचा धूमकेतू १९१० साली पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. त्यावेळेस अनेक लोकांनी धूमकेतूच्या शेपटीतून निघणाऱ्या धुरामुळे पृथ्वीवरील वातावरण दुषित होईल आणि त्यामुळे अंत होईल या कल्पोकल्पित कथेवर विश्वास ठेवला.
लेखक रिचर्ड नून यांनी ५ मे २००० मध्ये सर्व ग्रह एका रांगेत येतील अशी भविष्यवाणी वर्तवली होती. यामुळे बर्फ वितळेल आणि पृथ्वीच्या विनाशाच्या प्रारंभाला सुरवात होईल.

 

सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माया कँलेडरने २०१२ मध्ये विश्वाचा विनाश होईल असं भाकित वर्तवलं आहे. माया संस्कृती अमेरिकेत विकसीत झाली. आज मेक्सिकोत हे स्थान आहे. या भविष्यवाणीनुसार २१ डिसेंबर २०१२ मध्ये विश्वाचा विनाशाचे संकेत दिले आहेत. जगविख्यात नास्त्रोडामने देखील विश्वाची अखेर होईल अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. आजवर विश्वाचा अंत होईल असं वर्तवणाऱ्या सर्व भविष्यवाणी खोट्या ठरल्या हेत. आता प्रतिक्षा आहे ती माया कँलेडरने वर्तवलेल्या २१ डिसेंबर २०१२ रोजी होणाऱ्या विनाशाची भविष्यवाणी खरी ठरते का खोटी त्याची.

 

Tags: