हस्तरेषांचा प्रवास, ठरवेल परदेश प्रवास

स्तरेषांचा आपल्या भूतकाळाशी, वर्तमानाशी आणि भविष्यकाळआशी संबंध असतो. जशा आपल्या हस्तरेषा, तसंच आपलं जीवन. त्यामुळेच, संतती, संपत्ती, प्रवासाचे योग यासारख्या गोष्टींच्या खुणा आपल्या हस्तरेषांमध्ये मिळतात.

Updated: Dec 11, 2011, 10:16 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

हस्तरेषांचा आपल्या भूतकाळाशी, वर्तमानाशी आणि भविष्यकाळआशी संबंध असतो. जशा आपल्या हस्तरेषा, तसंच आपलं जीवन. त्यामुळेच, संतती, संपत्ती, प्रवासाचे योग यासारख्या गोष्टींच्या खुणा आपल्या हस्तरेषांमध्ये मिळतात.

बऱ्याच जणांच्य़ा मनात परदेशागमनाची इच्छा असते. त्यातही युरोप, अमेरिकेत जाण्यासाठी अनेक भारतीय मध्यमवर्गीय तरुण अक्षरशः तळमळत असतात. त्यासाठी खूप प्रयत्नही करत असतात.करत असतात. पण, तरी बऱ्याचवेळा हे स्वप्न साकार होत नाही. आपल्या नशीबात परदेशागमनाचा योग आहे की नाही हे आपण हस्तरेषांमधून समजून घेऊ शकतो.

 

 

ज्योतिष शास्त्रानुसार तळहातावर शुक्रक्षेत्र ( अंगठ्याच्या बरोब्बर खाली) आणि त्यासमोरील चंद्रक्षेत्र असतं.चंद्र क्षेत्रावरून मनुष्याची कल्पनाशक्ती, बौद्धिक क्षमता, कला, प्रेम तसंच मनोवृत्ती यांचे दर्शन घडते. याचबरोबर आपल्या हातावरची जीवनरेषा (शुक्राच्या पर्वताभोवतीची) जर दोषरहीत असेल आणि या जीवनरेषेच्या काही रेघा चंद्र क्षेत्रापाशी झेपावत असतील तर, त्याचा अर्थ असा की आपल्या नशीबात परदेशागमनाचा योग आङे. रेषा जितकी लांब आणि ठळक तितकं परदेशागमन महत्त्वाचं आणि मोठ्या प्रमाणावर असतं, असं म्हटलं जातं.

Tags: