लोकांच्या सेवेसाठी – बाळासाहेब ठाकरे

मी पक्ष काढला आहे तो लोकांच्या सेवेसाठी. माझा दुसरा विचार नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगत केंद्राय कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, अण्णा हजारे यांच्यावर जोरदार ठाकरी हल्ला चढविला तर पुतण्या राज ठाकरे यांनी चिमटा काढला. मी मैदान मिळवण्यासाठी कोर्टात गेलो नाही, असा टोला शिवसेनाप्रमुखांनी हाणला.

Updated: Feb 11, 2012, 10:56 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

 

मी पक्ष काढला आहे तो लोकांच्या सेवेसाठी. माझा दुसरा विचार नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगत केंद्राय कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, अण्णा हजारे यांच्यावर जोरदार ठाकरी हल्ला चढविला तर पुतण्या राज ठाकरे यांनी चिमटा काढला. मी मैदान मिळवण्यासाठी कोर्टात गेलो नाही, असा टोला शिवसेनाप्रमुखांनी हाणला.

 

 

ठाण्यात शिवसेनेच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. ही सभेला जमलेलं लोक पाहून बाळासाहेब ठाकरे यांना जोश संचारला होता. विनोदाची जोरदार फटकेबाजी करत त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. कितीही काहीही झालं तरी शिवसेनेचीच सत्ता येईल, असे सांगत ठाण्यानं शिवसेनेला भरभरून दिलं आहे. ठाणेकरांनी शिवसेनेला पहिला नगरसेवक दिला आहे. येथे जमलेली जनता ही शिवसेनेच्या प्रेमापोटी आली आहे. कोणी कितीही सांगो, सत्ता ही शिवसेनेचीच येईल. जर तुमच्यात ताकद असेल तर अशी प्रचंड सभा घेऊन दाखवा. मैदान न देता अडकाठी कशाला घालता. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी सभा घेऊन दाखवावी, असं खुले आव्हान ठाकरे यांनी दिलं.

 

 

शिवसेनेनं करून दाखवलं, तुम्ही काय केलं, असा प्रश्न करून लोकांच्या सेवेशिवाय दुसरा विचार नसल्याचे ठाकरे म्हणाले. तुम्ही टोमणे कशाला मारता, मर्दासारखे लढा, असा सल्ला ही विरोधकांना ठाकरे यांनी दिला. दुसरीकडं सोनिया गांधी आणि त्यांची मुलं लोकांना गंडा घालत आहेत. तुम्ही (जनता) यात फसत आहात. यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका. यावेळी समाजसेवक अण्णा हजारेंवर बाळासाहेब ठाकरे यांची जोरदार टीका केली. त्याचवेळी पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रींची खिल्ली उडविली.

 

 

शरद पवार आणि नारायण राणे यांची मालमत्ता कशी काय वाढत आहे. मी माझी मालमत्ता देतो तुम्ही मला तुमची मालमत्ता देणार काय़, असा सवालही बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला. गुजरातचा खरा चेहरा हा नरेंद्र मोदी आहे. हे माझं वाक्य मी त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांना सांगितले होते. ते आज खरं ठरलं आहे. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये नसेल तर विकास होणार नाही, हे मी अटलबिहारी वाजपेयी सांगितले होते. बरं समजलं का, गुजराती समाज शिवसेनेच्या पाठिशी आहे, असे ठाकरे म्हणालेत.

 

ठाण्यात बाळासाहेब ठाकरे काय बोललेत.. व्हिडिओ पाहा

 

[jwplayer mediaid="45967"]

 

[jwplayer mediaid="45979"]