काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद

यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2013, 08:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
जिल्ह्यातली डेहणी उपसा सिंचन योजना आपल्या प्रयत्नातून झाली असा दावा माणिकराव ठाकरे यांनी केलाय. तर या योजनेसाठी अजितदादांनी निधी दिला. यात माणिकरावांचे कोणतेही योगदान त्यात नाही. प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नसताना माणिकराव श्रेय घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी केला आहे.
२०१४ लोकसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच्या सगळ्या ४८ जागांवरच्या इच्छुकांची नावं आमच्याकडे तयार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं वक्तव्य करुन काँग्रेसनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
आमच्याकडे सगळ्या इच्छुकांची नावं बंद पाकिटात आहेत, ती पाकिटं फोडलेली नाहीत, असं माणिकरावांनी म्हंटलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादीबरोबरच्या चर्चेत मतदारसंघांमध्ये फेरबदलही होऊ शकतो, असंही माणिकराव म्हणाले. याआधी राष्ट्रवादीने आम्हाला पूर्वीप्रमाणेच जागा हवी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं की आम्ही वरिष्ठांनी बोलतो. तर आमच्या जागा वाटपाचा विषय झाल्याचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटले होते. त्यानंतर जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडली. आता या ठिणगीत काँग्रेसने भर घातली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.