www.24taas.com, झी मीडिया, परळी
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मुखाग्नी दिल्यानंतर, परळीत अंत्यविधी ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली आहे.
खुर्च्या मोडतोड केली आहे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे सीबीआय़ चौकशीची मागणी करत, ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला आहे.
यापूर्वी परळीतील जमावाने मंत्र्यांना घेरण्यास सुरूवात केली, गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या जमावाने केली.
जयंत पाटील आणि आर.आर.पाटील, छगन भुजबळ, राज ठाकरे यांच्यासह दिसेल त्या नेत्याला घेराव घालण्याचं काम, परळीकरांनी केलं.
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा यावेळी परळीकरांनी केल्या.
हर्षवर्धन पाटील यांची गाडी तर जागेवरून हलू देण्यासही कार्यकर्ते तयार नव्हते, दरम्यान यापूर्वी पंकजा मुंडे यांनी तुम्हाला साहेबांची शपथ आहे, शांतता राखा, असं आवाहन केलं होतं.
अंतिम दर्शनासाठी सुरूवातीला खचाखच गर्दी झाली होती. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून शांतता राखा, एकमेकांना ढकलू नका असं आवाहन आमदार पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय नेते राजीव प्रताप रूडी करत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.