www.24taas.com, झी मीडिया, बीड
> संतापलेल्या जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केला लाठिमार
>परळीत वातावरण तापलं... कार्येकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केली
> संतप्त जमावाचा गृहमंत्री राजनाथ सिंह, लालकृष्ण अडवाणी यांनाही घेराव..
> आर.आर.पाटील, राज ठाकरे, माणिकराव ठाकरे, उद्धव ठाकरे आदी नेते हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मुंबईच्या दिशेनं रवाना
> कार्यकर्त्यांकडून अनेक मंत्र्यांना घेराव, मुंडेंच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी
> संतप्त जमावाचा राज ठाकरेंच्या गाडीला घेराव, मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी
> संतप्त जमावाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर दगडफेक
> सीबीआय चौकशीची मागणी करत संतप्त जमावाचा मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव
* दुपारी 2.30 वाजता - मुंडे यांचा अंत्यविधी सुरळीत पार पडल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासहीत इतर काही नेत्यांच्या गाड्या अडवून धरल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी गाड्यांसमोर जोरजोरात घोषणा दिल्या.
लोकनेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन
दुपारी 01.50 - ग्रामीण भागाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे, ग्रामीण जनतेच्या कामांची आणि विकासाची नस ओळखणारे नेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलिन झाले आहेत. गोपीनाथ मुंडे यांना त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी मुखाग्नी दिली, दुपारी 01.50 वाजता गोपीनाथ मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी बीड जिल्ह्यातील परळीत गोपीनाथ प्रेमींचा जनसागर उसळला होता. आपल्या नेत्याच्या अंतिम दर्शन घेत, घोषणा आणि हुंदके देत हा जनसमुदाय पुढे सरकत होता. गोपीनाथ मुंडे अमर रहे, अमर रहे, परत या परत या, मुंडे साहेब परत या, अशा घोषणांनी वैद्यनाथ साखर कारखान्याचा परिसर आणि परळी परिसर दणाणून गेला होता.
वर्तमान पत्रात आलेला फूलपेज फोटो हातात घेऊन कार्यकर्ते आपल्या नेत्यावरील प्रेम व्यक्त करत होते. तर पोस्टर्सवर देवा तुला शोधू कुठे असं लिहून आपल्या भावना व्यक्त करत होते.
अंतिम दर्शनासाठी सुरूवातीला खचाखच गर्दी झाली होती. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून शांतता राखा, एकमेकांना ढकलू नका असं आवाहन आमदार पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय नेते राजीव प्रताप रूडी करत होते.
अपडेट :
* दुपारी 1.48 वाजता - गोपीनाथ मुंडे यांची मोठी कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी दिला मुखाग्नी
* परळीत उसळलेली तुडुंब गर्दी गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी वैद्यनाथच्या पटांगणात दाखल
* उद्धव ठाकरे, मनोहर पर्रिकर यांनी परळीत जाऊन मुंडेंच्या पार्थिवाचं घेतलं अखेरचं दर्शन
* आपल्या लाडक्या नेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांमध्ये थोडी-थोडी धक्काबुक्कीही होताना दिसतेय.
* देवेंद्र फडणवीस गर्दीला गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचं शांततेनं अंत्यदर्शन घेण्याच्या सूचना देत आहेत.
* सकाळी 12 वाजता - राजनाथ सिंह, रमण सिंह, शिवराज सिंह चौहान, मनोहर पर्रिकर परळीत उपस्थित
* सकाळी 11.35 वाजता - गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव लष्कराच्या विशेष हेलिकॉफ्टरमधून परळीमध्ये दाखल... परळी लातूरपासून जवळपास 117 किलोमीटर अंतरावर आहे.
* लोकसभेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली दिली गेली. श्रद्धांजलीनंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलंय.
* पूनम महाजन, अमित देशमुख, उदयनराजे भोसले, राजीव प्रताप रुडी, विनोद तावडे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड लातूरमध्ये उपस्थित
* सकाळी 10.05 वाजता - गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव घेऊन विमान लातूर एअरपोर्टवर दाखल... लातूरहून लष्कराचं विशेष हेलिकॉफ्टर परळीसाठी थोड्याच वेळात होणार रवाना
* राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यपृथ्वी पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परळीला अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार
* दुपारी 2 वाजता मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील.
* लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंग, प्रकाश जावडेकर, शिवराज चव्हाण, मनोहर पर्रिकर, रमन सिंग आदी. परळीमध्ये मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण