औरंगाबाद : औरंगाबाद तसा पाण्याचा नेहमीचाच ठणठणाट.. शहराला तीन दिवसाआड तर, कुठे 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र औरंगाबाद महापालिकेच्या घोडचुकीमुळे रोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही... जायकवाडी ते औरंगाबाद या मार्गावर हजारो लिटर पाण्याची नासाडी दिवसरात्र सुरुय... मात्र महापालिका आता दुष्काळाच्या नियोजनाच्या गप्पा मारतेय...
जुलै महिना उजाडला तरी सुद्धा पाऊस अजूनही बेपत्ता आहे.. औरंगाबाद शहराला गेल्या कित्येक वर्षापासून कधी 3 तर कधी 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. ही सगळी संकटे नैसर्गिक असली तरी महापालिका मात्र या संकटाबाबत गंभीर नसल्याचंच दिसतेय.. औरंगाबादला जायकवाडी धऱणातून पाणीपुरवठा होतो मात्र कित्येक ठिकाणी पाईप लाईन फुटली असल्याने रोज लाखो लिटर पाणी किमान वर्षभरापासून वाया जातेय.
पैठणमध्ये पाण्याची चोरी
पैठण रोडवर चितेगाव जवळ दोन ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी चोरी होत असल्याचं समोर आलय. गेली कित्येक वर्ष या गावातील लोक असेच पाणी भरताय.. तर बिडकीन गावाजवळ तर पाईपला चिरा गेली आहे. या पाण्यानं नाले सुद्धा 12 महिने वाहत असतात. केवळ या ठिकाणीच नाही तर अशा अनेक ठिकाणी पाण्याची अशीच नासाडी सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.