www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी सध्या राजकीय विजनवासात असलेले अशोक चव्हाण किंवा त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
भास्करराव पाटील खतगांवकर यांनी माघार घेऊन अशोक चव्हाण यांचा मार्ग मोकळा करुन दिलाय.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला अनुकुल वातावरण असून, महायुतीकडून फार मोठं आव्हान दिलं जाईल अशी सध्याची स्थिती नाही.
त्यामुळं उमेदवारी अशोक चव्हाण यांना मिळणार की त्यांच्याऐवजी चव्हाणांची पत्नी अमिता यांना उमेदवारी दिली जाणार याबाबत मतदारसंघात तर्कवितर्क लढवले जाताहेत.
भाजपचे उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव य़ांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.
लातूरचं तिकीट काल रात्री डॉ. गायकवाड यांना जाहीर झाल्यामुळे भालेराव नाराज झालेत. वंजारी समाज आपल्यामागे ठाम उभा असल्य़ाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.