शिर्डीनंतर आता परभणीत सेनेला खासदारांचा `दे धक्का`

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुंबईत सत्ता आण्यासाठी शिवबंधन धागा बांधून शपत घेतली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. याआधी शिर्डीचे खासदार यांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर परभणीचे खासदार राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 22, 2014, 10:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, परभणी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुंबईत सत्ता आण्यासाठी शिवबंधन धागा बांधून शपत घेतली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. याआधी शिर्डीचे खासदार यांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर परभणीचे खासदार राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत.
परभणीचे शिवसेनेचे खासदार गणेश दुधगावकरही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. देवगिरीवर त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. भाऊसाहेब वाघचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यावर आता दुधगावकरही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना हा दे धक्का असल्याचे दिसून येत आहे.
कल्याणचे खासदार आनंद परांजपे, भाऊसाहेब वाकचौरे आणि आता गणेश दुधगावकर अशा प्रकारे शिवसेनेच्या तिस-या खासदाराचा शिवसेनेला जय महाराष्ट्र आहे. परभणी आणि शिवसेना खासदारांची बंडखोरी असं एक वेगळंच समीकरण असल्याचं दिसतंय. त्यामुळे शिर्डीबरोबरच परभणीसाठी शिवसेनेला नवा चेहरा निवडावा लागणार आहे. मात्र, दुसऱ्या पक्षात खासदार गेल्याने त्या पक्षाला सामना आता शिवसेनेला करावी लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.