www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगलीत अभिनेता नाना पाटेकर याने राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. नेते निवडून आल्यावर त्यांची मालमत्ता चौपट होते, असल्या नेत्यांना जनतेनं जाब विचारायला हवा, असं नाना म्हणाला. त्यांनी आपल्या नाना-स्टाईलमध्ये मराठी पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
सांगलीत जाऊन त्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटलांचं कौतुक केलं. आर आर साधे आहेत. ते खरंच काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावे लागत आहे. जर त्यांनी काम केले नसते तर मी त्यांच्यावर टीका केली असती. गेल्या ६० वर्षात मराठी पंतप्रधानपदाचा उमेदवार मिळू नये, ही शरमेची बाब आहे, असं नाना म्हणाला.
महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण झालेत. त्यांच्यानंतर असा नेता झाला नाही. महाराष्ट्रात एक माणूस पंतप्रधानपदासाठी होऊ शकत नाही. चव्हाण यांच्या स्मृती आता जपता येणार नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. ते खरं आहे. पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत का, ते माहित नाही. मात्र, त्यांनी सांगितलेले बाब म्हत्वाची आहे, असे यावेळी नाना याने स्पष्ट केले.
राजकीय सभेच्यावेळी बोलताना नेत्यामध्ये एक भिंत असते. मात्र, ही भिंत असता कामा नये. तरच लोक आपल्या जवळ येतील. भिंत पाडली तर लोक नेत्याच्या जवळ येतील. हे बेन आपल्यातलं आहे, असं वाटते. त्यावेळी नाळ जुळते. यावेळी नाना यांने आपल्या आवडीचा डायलॉग म्हटला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ