पोलीस भरतीत परप्रांतीयांना `रेड कार्पेट`, मनसे संतापली!

पोलीस दलात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारनं चांगलाच धक्का दिलाय. पोलीस दलात नोकरीसाठी आवश्यक असणारी डोमिसाईलची अट रद्द करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2013, 05:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
पोलीस दलात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारनं चांगलाच धक्का दिलाय. पोलीस दलात नोकरीसाठी आवश्यक असणारी डोमिसाईलची अट रद्द करण्यात आलीय.
पोलीस भरतीच्या वेळी महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या अधिवासाच्या पुराव्याच्या प्रमाणपत्राची अट यापूर्वी उमेद्वारांना पूर्ण करावी लागत होती. त्यामुळं पोलीस दलात महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या उमेदवारांनाच भरती होता येत होतं. आता ही अटच रद्द करण्यात आल्यानं परप्रांतीयांना पोलीस भरतीत ‘रेड कार्पेट’ टाकल्याची भावना निर्माण झालीयं.

दरम्यान, डोमिसाईलची अट रद्द केल्यानं मनसे आक्रमक झालीय. याविरोधात मनसेनं औरंगाबादमध्ये जोरदार निदर्शनं केली. परप्रांतियांचा टक्का पोलीस दलात वाढवण्यासाठीच हा डाव खेळला जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. राज ठाकरेंनी स्वत:हून या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांनी केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.