www.24taas.com, जालना
महाराष्ट्राच्या विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या थट्टा उडविणाऱ्या वक्तव्याने गदारोळ माजला असताना भडकलेल्या कार्यकर्त्यांनी जालनामध्ये मात्र अजित पवार यांचे नाव एका शौचालयाला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या संदर्भात जालनाहून मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एका शौचालयाला अजित पवार यांचे नाव दिले आहे. दुष्काळग्रस्तांची थट्टा करणारे आणि भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते या अजित पवारांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.
तसेच काही कार्यकर्त्यांनी जालना येथील शौचालयावर अजित पवार यांचे पोस्टरही लावले आहे.
‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का? बरं मुतण्यासाठी पुन्हा पाणीच लागेल. पाणीच नाही प्यायला तर लघवी तरी कुठून होणार? रात्री भारनियमन केलं जात आहे.’ त्यामुळे माझ्या असं लक्षात आलंय की याच काळात मुलांच्या जन्माचं प्रमाण वाढतंय. लाईटच नाही म्हटल्यावर दुसरा उद्योग काय करणार? आरं तुम्ही म्हणाल आज काय सकाळीच टाकून आलाय की काय?’ आणि याच अजित पवारांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली.