अजित पवार यांचे भाषण सुरू, अजित पवारांनी केली तुफान फटकेबाजी
माझी बदनामी करण्यासाठी मीडियाचा वापर केला जात आहे - अजितदादा
विरोधक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत - अजितदादा
पवार साहेबांवरही खोटे आरोप केले जात आहेत - अजितदादा
मी राजीनामा सरळ सरळ तोंडावर फेकला - अजितदादा
घोटाळ्याचे आरोप करणारी दमानियाही खोटारडी - अजितदादा
माझ्याकडे कुणी राजीनामा मागितलेला नव्हता, सिंचन घोटाळ्याच्या गदारोळावरून तो मी दिला आहे - अजितदादा
मला सामान्य लोकांची कामं करायची आहेत. आणि त्यासाठी मला कोणी रोखू शकत नाही - अजितदादा
कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की, कुणाचेही पोस्टर जाळू नका - अजितदादा
मी कुणावर नाराज होऊन राजीनामा दिलेला नाही - अजितदादा
साधा सरपंच सुद्धा आपली खुर्ची टिकविण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र मी खुर्चीसाठी थांबलो नाही - अजितदादा
कार्यकर्त्यांनी शांत राहावं काहीही गडबड करू नये - अजितदादा
धरणाच्या किंमती आम्ही वाढवल्या का? - अजितदादा
आरोप झाले म्हणून सरळसरळ माझा राजीनामा तोडांवर फेकला - अजितदादा
प्रकल्प रखडतात म्हणून खर्च वाढतो - अजितदादा
जनता सोबत आहे तोवर राष्ट्रवादीला चिंता नाही - अजितदादा
परत घेण्यासाठी राजीनामा दिलेला नव्हता - अजितदादा
उपसा जलसिंचन योजना योग्यच आहे - अजितदादा
कर नाही त्याला डर कशाला - अजितदादा
कोळसा घोटाळ्यावरून लक्ष हटविण्यासाठी माझ्यावर आरोप करण्यात आले - अजितदादा
अजितदादांनी साधला काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा
आरोपांची किंमत मात्र चुकवावी लागेल - अजितदादा
विजय पांढरेवर नाव न घेता केली टीका
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नेहमीच टार्गेट केलं जातं - अजितदादा
पवार साहेब जी जबाबदारी देतील ती संभाळणार - अजितदादा
काँग्रेस कोळशाचं काळं आमच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला जात आहे - अजितदादा
आम्ही जसं बोलतो, तसचं आम्ही करतो - अजितदादा
शेतकऱ्यांनी काहीही फुकट मागू नये - अजितदादा
संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सांगणार की, श्वेतपत्रिका काढा - अजितदादा
बिनबुडाचे आरोप करण्याची काही जणांना सवयच आहे - अजितदादा
हे माझ्याविरोधात रचण्यात आलेलं षड्यंत्र आहे - अजितदादा
पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे प्रकल्पांना उशीर होतो आहे - अजितदादा
राजीनामा हे काही नाटक नाही - अजितदादा
सिंचनाची श्वेतपत्रिका काढावीच, सत्य समोरच येईल - अजितदादा
अजित पवारांचे काँग्रेसला जोरदार टोमणे