काकांच्या सोहळ्याला अजित पवारांची दांडी

पुण्यात `लोकनेते शरद पवार` या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2012, 01:47 PM IST

www.24taas.com,पुणे
पुण्यात `लोकनेते शरद पवार` या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली.
राम कांडगे यांनी शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचं प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होतं. परंतु कार्यक्रमाला ते उपस्थित राहू न शकल्यानं विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
गृहमंत्री आर आर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे माजी खासदार श्रीनिवास पाटीलही कार्यक्रमाला उपस्थित होते. पुण्यात टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम झाला. अजित पवार यांचा मंत्रिमंडळात पुनर्रप्रवेश झाला. त्यांचा शपथविधी उरकून गृहमंत्री आर. आर. पाटील आणि दिलीप वळसे-पाटील पुण्यात पोहोचले. मात्र, अजित पवार पोहचू शकले नाहीत.
याआधी गुजरात राज्यात भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार उपस्थित नव्हते. त्यावेळी काका-पुतण्याचे बिनसले असल्याची चर्चा होती. त्यावेळी दादांना ताप आल्याचे त्यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले, अजितदादाचा ताप गेला तो बर झालं, असं खोचक उत्तर दिलं होतं.
दरम्यान, मात्र, अजितदादा का उपस्थित राहिले नाहीत, याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात दादांची दांडी चर्चेचा विषय झाला आहे होता. त्याचवेळी अजित पवार पुण्यात दोन लग्न समारंभाना उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा पुस्तक प्रकाशनाला मात्र आले नाहीत. मुंबईहून पुण्याला रस्ता मार्गाने निघाले होते. रस्त्यात अनेक ठिकाणी स्वागत सत्कारामुळे ते कार्यक्रमाला पोहचू शकले नाहीत, असे संयोजकनी कुजबुज सुरू झाल्यानंतर सांगितले.