स्टेमसेल दान काळाची गरज

बोनमॅरो ट्रांसप्लांट आणि स्टेमसेल दान म्हणजे गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे या रुग्णांच्या जीवनात आयुष्याची नवी पहाट उजाडते आहे.

Updated: Feb 22, 2012, 03:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बोनमॅरो ट्रांसप्लांट आणि स्टेमसेल दान म्हणजे गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे या रुग्णांच्या जीवनात आयुष्याची नवी पहाट उजाडते आहे.

 

ल्युकिमिया, एनिमिया आणि थॅलिसिमिया अशा अनेक जीवघेण्या आजारांनी त्रस्त रुग्णांना घाबरण्याचं कारण नाही. अशा गंभीर आजारांवर आता उपचार शक्य आहे. या रुग्णांनासुद्धा आता पुन्हा नव्याने जीवन जगणं शक्य आहे. (ब्लड आणि बोनमॅरो कॅन्सर, ल्युकिमिया आणि एनिमियासारख्या आजारांचा इलाज बोनमॅरो ट्रांसप्लांटने होतो)

 

मानवाचे शरीर एखाद्या क्लिनिकप्रमाणे असतं. स्वतःचा इलाज करण्याची क्षमता प्रत्येकाच्या शरीरात असते. शरीराच्या अनेक भागात असलेल्या बोनमॅरोमध्ये रुग्णांना बरं करण्याचा इलाज असतो. स्वतःचं नाहीतर या स्टेमसेलमुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलादेखील आपण नवीन जीवन देऊ शकतो. (बोनमॅरो ट्रान्सप्लांटमध्ये कोणतीही सर्जरी नसते. दात्याकडून स्टेमसेल घेऊन ते रुग्णाला देणे ही प्रक्रिया रक्तदानाप्रमाणेच आहे)

 

विकसित देशात स्टेमसेल दान करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मात्र भारतात माहितीअभावी स्टेमसेल दान करण्यात येत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी यात योगदान दिलं तर देशातल्या अनेकांना नवीन जीवन मिळू शकतं. मात्र यासाठी गरज आहे ती प्रत्येकानं पुढं येऊन स्टेमसेल दान करण्याची.