'वृद्धांचे आरोग्याबरोबर राहणीमान सुधारणार'

आज जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातोय. ६ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिनास सुरुवात झालीय. यंदा 'निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव' हे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेच आहे. पुढील एक वर्ष जागतिक आरोग्य संघटना वृद्धांचे राहणीमान सुधारण्यासाठी कार्य करणार आहे.

Updated: Apr 7, 2012, 08:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

आज जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातोय. ६ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिनास सुरुवात झालीय. यंदा 'निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव' हे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेच आहे. पुढील एक वर्ष जागतिक आरोग्य संघटना वृद्धांचे राहणीमान सुधारण्यासाठी कार्य करणार आहे.

जनतेच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि आयुर्मानवाढवं यासाठी  ७  एप्रिलला जागतीक आरोग्य दिन साजरा केला जातो.  यंदाचं 'निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव' हे यंदाच आरोग्य दिनाचं घोषवाक्य आहे.  विशेषतं वृध्दांना सामाजिक सुरक्षा देणं, त्यांनी आनंदी जीवन जगावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

देशात आरोग्याच्या अपु-या सुविधा आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळत नाही. अंदाजपत्रकात आरोग्यासाठी  ३ टक्क्यांपेक्षा अधिक तरतूद अपेक्षित आहे. यंदा अडीच टक्केच तरतुद करण्यात आलीय. ३०० नागरिकांमागे एक डॉक्टर असालया हवा पण भारतात १७०० नागरिकांमागे एक डॉक्टर आहे. हे प्रमाण पाहता देशातली आरोग्याची स्थिती लक्षात येईल. रोगावरील उपचारासाठी मोठा खर्च केला जातो. मात्र रोग प्रतिबंधकासाठी अधिक खर्च करण्याची गरज आहे. तर अनेक रोगांना प्रतिबंध करता येईल.