रुग्णांसाठी संगीत आरोग्यदायी

जे संगीत आपल्याला आवडते, ते संगीत ऐकल्यावर आपण आनंदीत होतो. शिवाय ताजेतवाणे होतो. मन प्रसन्न राहते. आपल्याला आलेले टेन्शनही दूर होते. थोडक्यात काय, संगीताचे अनेक फायदे, लाभ आहेत. आता संशोधनातून असेही पुढे आले आहे की, संगीत ऐकल्याने रूग्णांसाठी आरोग्यदायी ठरते. रूग्णाने संगीत ऐकल्याने त्याला आजाराच्या तणावातून मुक्तता मिळले.

Updated: Apr 17, 2012, 10:56 AM IST

www.24taas.com, लंडन

 

 

जे संगीत आपल्याला आवडते, ते संगीत ऐकल्यावर आपण आनंदीत होतो. शिवाय ताजेतवाणे होतो. मन प्रसन्न राहते. आपल्याला आलेले टेन्शनही दूर होते. थोडक्यात काय, संगीताचे अनेक फायदे, लाभ आहेत. आता संशोधनातून असेही पुढे आले आहे की, संगीत ऐकल्याने रूग्णांसाठी आरोग्यदायी ठरते. रूग्णाने संगीत ऐकल्याने त्याला आजाराच्या तणावातून मुक्तता मिळले.

 

 

शस्त्रक्रियेदरम्यान  रुग्णांना संगीत ऐकवल्याने शस्त्रक्रियेबाबतची भीती आणि ताण पळून जातो. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतर प्रकृती वेगाने सुधारण्यासही मदत होते, असा दावा संशोधकांनी केला आहे. आगामी काळात संगीत हे शस्त्रक्रियेतील एक अविभाज्य घटक बनेल, असा विश्वास संशोधकांचा आहे. संगीताचे अनेक फायदे आतापर्यंत आपल्याला माहीत आहेत. उदास वाटत असल्यास संगीत ऐकल्याने मन आनंदी होते. ताणतणावापासून मुक्ती मिळते. त्यामुळे संशोधका्चा दाव्याला अधिक पुष्टी मिळत आहे.

 

 

ऑक्सफर्डमधील जॉन रॅडक्लिफ रुग्णालयातील पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. ज्यांना शस्त्रक्रियेसाठी अल्प प्रमाणात भूल देण्यात येते आणि जे शस्त्रक्रियेदरम्यान जागृत अवस्थेत असतात, अशा रुग्णांना संगीत ऐकवल्यास त्यांच्यामधील अस्वस्थता कमी  होते. त्यामुळे त्यांचे मन शांत होते, असे संशोधकांना आढळून आले आहे. ही संगीताची खरी जादू आहे.

 

 

संशोधनासाठी लहान शस्त्रक्रिया होणा-या ९६ रुग्णांची संशोधकांच्या पथकाने निवड केली होती. शस्त्रक्रियेदरम्यान अर्ध्या रुग्णांना रेडिओवरून प्रक्षेपित होणारी किंवा शल्यविशारदांनी निवडलेल्या संगीताच्या सीडीज ऐकवण्यात आल्या तर अन्य अर्ध्या रुग्णांवर नेहमीच्या शांततापूर्ण वातावरणात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे या शस्त्रक्रियेदरम्यान सर्व रुग्ण अर्धजागृतावस्थेत होते. अपघातामुळे झालेल्या जखमा स्वच्छ करून त्यावर लहान शस्त्रक्रिया करणे आणि जखमेची जागा र्निजतूक करण्याचे उपचार या रुग्णांवर करण्यात येत होते. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान संगीत ऐकवण्यात आले होते. त्यांना कमी प्रमाणात अस्वस्थता जाणवत होती. तसेच त्यांच्या श्वसनाची गतीही इतरांपेक्षा कमी होती, असे संशोधकांना दिसून आले.

 

 

शस्त्रक्रियेच्यावेळी प्रत्येक रुग्णांवर थोड्याफार प्रमाणात ताण असतो. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना कोणताही ताण न येऊ नये, या दृष्टीने आमचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात, असे शल्यविशारदांनी सांगितले. हे संशोधन काही रुग्णांवरच करण्यात आले होते. या संशोधनामुळे शस्त्रक्रियेदरम्यान संगीत ऐकवल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात शस्त्रक्रियेदरम्यान संगीताचा वापर निश्चितच करण्यात येईल, असा विश्वास या संशोधनाचे प्रमुख डॉ. हाझीम सदिद्दीन यांनी व्यक्त केला आहे.