www.24taas.com, हैदराबाद
हैदराबादमध्ये तीन शक्तीशाली स्फोट झाल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादमधील स्फोटात १० ठार तर १२ जखमी झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षेत वाढ करण्यात आलीय आहे.
हैदराबादमध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात १० ठार तर१२ जण जखमी झाल्याचे वृत्त समजताच परिसरात घबराट पसरली आहे. पहिला स्फोट कोणार्क थिएटरजवळ तर दिलसुखनगरमध्ये वेंकटाद्री थिएटरमध्ये जवळ दोन स्फोट झालेत. या स्फोटानंतर मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय.
हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आणखी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
हैदराबादमधील दिलसुखनगरमध्ये याआधी दोन वेळा स्फोट करण्याचा प्रयत्न झाला होता. हैदराबादमधील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली असून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
मुंबईतील चेंबूर येथील भाभा अणूसंशोधन केंद्र आणि बॉम्बे हाय येथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.