सचिन महाशतक पूर्ण करेल - धोनी

सचिन तेंडुलकर फिरोजशाह कोटला मैदानावर शतकांचे शतक नक्कीच पूर्ण करेल, अशी आशा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केली आहे.

Updated: Nov 6, 2011, 11:05 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

सचिन तेंडुलकर फिरोजशाह कोटला मैदानावर शतकांचे शतक नक्कीच पूर्ण करेल, अशी आशा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केली आहे.

सचिन तेंडुलकरला वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावून घरच्या मैदानावर शतकांचे शतक पूर्ण करण्याची संधी आहे.  याविषयी बोलताना धोनी म्हणाला, सचिन त्याच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा या सामन्यात पार करेल असे वाटतेय.  सचिनच्या शतकानंतर मी त्याच्याविषयी बोलेल. त्यामुळे तो शतक पूर्ण करेल आणि मी त्याच्याविषयीच पाचव्या दिवशी बोलेल.