हॅप्पी बर्थडे 'कॅप्टन महेंद्रसिंग धोनी'....

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं टीम इंडियाला क्रिकेटच्या अतिउच्च शिखरावर पोहचवलं. आपल्यामधील लीडरशीप क्वालिटीमुळे त्यानं टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. भारताचा तो ऑल टाईम ग्रेट कॅप्टन आहे.

Updated: Jul 7, 2012, 12:10 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं टीम इंडियाला क्रिकेटच्या अतिउच्च शिखरावर पोहचवलं. आपल्यामधील लीडरशीप क्वालिटीमुळे त्यानं टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. भारताचा तो ऑल टाईम ग्रेट कॅप्टन आहे. माहीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरचा घेतलेला हा खास आढावा....

 

महेंद्रसिंग धोनी  (टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन)

आक्रमक बॅट्समन आणि जबरदस्त विकेटकिपर..... टीम इंडियाच्या कॅप्टन कूलनं ३१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. २३ डिसेंबर २००४ मध्ये रांचीच्या या राजकुमारनं क्रिकेटफिल्डवर एंट्री घेतली. लांब केसाच्या या बॅट्समननं आपल्या स्फोटक बॅटिंगनं अवघ्या काही काळातच क्रिकेटप्रेमींवर मोहिनी टाकली. आणि त्यानंतर एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत केली.

 

अवघ्या अडीच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव गाठीशी असलेल्या माहीला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचा काटेरी मुकुट डोक्यावर ठेवण्यात आला होता. त्यानं कॅप्टन्सीची ही जबाबदारी लीलया पेलली आणि २००७ मध्ये भारताला पहिल्या-वहिल्या टी-२० वर्ल्ड कपचं भारताला अजिंक्यपद मिळवलं.

 

त्यानंतर भारताला टेस्टमध्ये बेस्ट बनवलं. २०११ मध्ये तब्बल २४ वर्षांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याची किमयाही त्यानं साधली. तब्बल दोन वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन माही सर्वात श्रीमंत भारतीय प्लेअर ठरला आहे. त्यातच त्याला इंडियन आर्मीची मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवीही देण्यात आली आहे.

 

टाईम्सच्या टॉप १०० इन्फ्लुएंशल पीपल्समध्ये त्यानं स्थान पटकावलं होतं. स्पोर्टस प्रोनं त्याला सर्वोत्तम ऍथलिटमध्ये १६ वा क्रमांकही दिला होता. भारताच्या या ऑल टाईम ग्रेट कॅप्टनला 'झी २४ तास'कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .....