सेह'वाघ' खेळी, राजस्थानवर हरण्याची पाळी

राजस्‍थान रॉयल्‍सला विरेद्र सेहवागने अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. आणि त्याने सलग पाचव्यादांना अर्धशतक ठोकून दिल्लीला विजय मिळवून दिला.

Updated: May 1, 2012, 11:17 PM IST

www.24taas.com, जयपूर

 

राजस्‍थान रॉयल्‍सला विरेद्र सेहवागने अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. आणि त्याने सलग पाचव्यादांना अर्धशतक ठोकून दिल्लीला विजय मिळवून दिला. सेहवागच्‍या आक्रमक खेळीच्‍या जोरावर दिल्‍लीने ५ विकेट्सने विजय मिळविला.

 

सेहवागचा झंझावात सुरु असतानाच दिल्‍लीला दोन झटके देण्‍यात राजस्‍थानच्‍या गोलंदाजांना यश आले. रॉस टेलर अवघ्‍या 6 धावा काढून तंबुत परतला. त्‍यानंतर सेहवागला हॉगने बाद केले. सेहवागने ३८ चेंडुंमध्‍ये ७३ धावा काढल्‍या.

 

सेहवागने अप्रतिम फटकेबाजी करुन दिल्‍लीला विजयाच्‍या जवळ पोहोचविले. परंतु, सेहवागच्‍या खेळीसोबत नवोदित फिरकीपटू पवन नेगीने ४ महत्त्वाच्‍या विकेट्स घेऊन राजस्‍थानच्‍या फलंदाजीला खिंडार पाडले