www.24taas.com, मुंबई
सचिन निश्चतच आदर्शवत आहे आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी तो कायम आदर्शच राहिल. सचिन एक मिथ आहे, तो दंतकथा बनला आहे. सचिन परिकथा बनून राहिला आहे.
सचिन जादूगार आहे फक्त मध्यंतरीच्या काळात त्याची जादुची कांडी कुठेतरी हरवली होती एव्हढचं.
सचिनच्या फटकेबाजीचा सर्वात जास्त मार कुणी खाल्ला असेल तर तो त्याच्या बॅटने, पण तो निवृत्ती जाहीर करेल तेव्हा ती सर्वात जास्त रडेल. सचिनची बॅट म्हणेल की तुझ्यासाठी मार खाणं मला आवडेल.
सचिनच्या सोबत कारकिर्दीची सुरवात करणारे अनेक जण आज कॅमेन्ट्रेटर, अम्पायर झाले. पण सचिन सचिनच राहिला आहे. सचिनने स्वत:चा मैदानात पुतळा उभा केला आहे आणि त्याला अढळस्थान प्राप्त झालं आहे.
अंजली नसती तर सचिनही नसता. अंजलीने सचिनसाठी खूप काही केलं आहे. सावली असते तिला अस्तित्व नसतं, अंगही नसतं. सावली आपली सतत सोबत करते, दुपारी आपण तिला पायाखाली घेतो पण तरीही ती रागवत नाही. सावली सतत आपल्या पाठीशी असते तशीच अंजलीही सचिनच्या पाठीशी कायम राहिली आहे.
सचिनच्या वडिलांच्या बाबतीत मी त्याला म्हणालो होतो की ते आहेत कुठेतरी ते गेले नाहीत. माणसाचा मृत्यू झाला तरी तो कुठेतरी असतो. आणि माझा ठाम माझा विश्वास आहे कि सचिनचे वडिल कुठूनतरी आज त्याचा हा क्षण पाहत असतील. सचिनच्या वडिलांना निश्चित या क्षणाच्या अनुभवाने आनंद झाला असेल.