सचिन आयपीएलच्या लज्जारक्षणासाठी पुढे

2012 चा आयपीएल सीझन मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घडामोंडींमुळे अधिक गाजला. त्यातच मॅच फिंक्सिंगच गालबोटही या सीझनला लागलं. मात्र, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एका घटनेमुळे क्रिकेटकडे नकारात्मक दृष्टीनं पाहू नका असं मत व्यक्त केलं आहे.

Updated: Jun 1, 2012, 08:37 PM IST

मेघा कुचिक, www.24taas.com, मुंबई

 

2012 चा आयपीएल सीझन मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घडामोंडींमुळे अधिक गाजला. त्यातच मॅच फिंक्सिंगच गालबोटही या सीझनला लागलं. यामुळे फिक्सिंगचा आरोप असणा-या पाच क्रिकेटपटूंना निलंबितही करण्यात आलं. मात्र, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एका घटनेमुळे क्रिकेटकडे नकारात्मक दृष्टीनं पाहू नका असं मत व्यक्त केलं आहे.

 

इंडियन प्रीमीयर लीग आणि वाद हे समीकरणचं बनलं आहे. मैदानावरील क्रिकेटपेक्षा वादांमुळेच ही टुर्नामेंट गाजली. आणि पाचवा सीझन तरी याला कसा अपवाद राहणार. किंबहूना पाचवा सीझन लक्षात राहणार आहे तो शाहरुख खान, सिद्धार्थ माल्या यांच्या बेताल आणि मग्रुर वागण्यानं. फिक्सिंगमुळे आणि आयपीएलमधील काळ्या पैशाच्या वापराच्या आरोपांमुळे इंडियन प्रिमियर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचं एका स्टिंग ऑपरेशद्वारे उघड झालं आणि पुन्हा एकदा आयपीएलमुळे क्रिकेटला कलंक लागला. शलभ श्रीवास्तव, टीपी सुधिंद्र, मोहनिश मिश्रा, अमित यादव आणि अभिनव बाली या पाचही क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप असल्यानं त्यांना क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून सस्पेंड करण्यात आलं. असं असलं तरी, यामुळे फिक्सिंगमागचे खरे चेहरे मात्र समोर आलेच नाहीत.

 

मात्र, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा फिक्सिंगचं भूत भारतीय क्रिकेटच्या मानगूटीवर बसलं. भारतीय क्रिकेटची यामुळे क्रिकेटविश्वात चांगलीच बदनामी झाली. मात्र, भारतीय क्रिकेटचा आदर्श असणा-या सचिन तेंडुलकरनं फिक्सिंगप्रकरणी एका वाईट घटनेमुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू नका असं मत व्यक्त केलं आहे.क्रिकेटच्या देवानचं क्रिकेटप्रेमींना क्रिकेटकडे नकारात्म द्रृष्टिनं बघू नका असं म्हटलं. मात्र, मॅच फिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेटला कलंक लागला आहे ही बाबही नाकारता येत नाही....