धडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त

इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.

Updated: May 31, 2012, 06:55 PM IST

www.24taas.com, लंडन

इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.

पीटरसन याने टी-२० चा वर्ल्डकप चार महिन्यांवर असताना निवृत्ती जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इंग्लड गेल्या वर्षी टी-२० विश्व चषकाचा विजयी संघ होता.

सध्या वन डेचे भरगच्च वेळापत्रक पाहता माझे शरीर याला साथ देईल असे वाटत नाही, त्यामुळे मी वन डे आणि टी-२० सामन्यातून निवृत्ती घेत असल्याचे पीटरसन याने एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.