www.24taas.com, मुंबई
रविवारी मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यातील लढतीमध्ये चांगली रंगत आली. डेक्कनचे विजयासाठी १०१ रन्सचे तुटपुंजे आव्हान पेलण्यासाठी मुंबईला तब्बल १८.१ षटके आणि पाच फलंदाज गमवावे लागले. मुंबईला विजय मिळाला तरी घरच्या मैदानावर १०१ रन्स करताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले.
लसिथ मलिंगाची ड्टोदक गोलंदाजी याचप्रमाणे रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबईने डेक्कनचा पराभव केला. मुंबईने आपल्या ९व्या सामन्यांत ५व्या विजयाची नोंद करताना आयपीएल गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. डेक्कनकडून ४-०-१०-३ अशी भन्नाट गोलंदाजी करणाऱ्या डेल स्टेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबईची सुरुवात खराब झाली. रिचर्ड लेव्हीला पहिल्याच चेंडूवर डेल स्टेनने शून्यावर तंबूची वाट दाखवली. मग वीरप्रताप सिंगने १४ ररन्सवर सचिन तेंडुलकरला बाद करण्याची किमया साधली. त्यानंतर दिनेश कार्तिकने निराशा केली. परंतु रोहित शर्माने जेम्स फ्रॅन्कलिनच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ३० रन्यची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. अखेर जे. पी. डय़ुमिनी याने रोहितचा अडसर दूर केला. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात इशांक जग्गीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. रोहितने ४८ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह ४२ रन्सची खेळी साकारली. मग जेम्स फ्रॅन्कलिनही (१३) माघारी परतला. तेव्हा मुंबईच्या धावफलकावर १६.१ षटकांत ५ बाद ८१ रन्स केल्या होत्या. सामना दोलायमान अवस्थेत होता. फिरकी गोलंदाज अमित मिश्राचे १८वे षटक महत्त्वाचे ठरले. या षटकात रायुडूने दोन चौकार खेचले. मुंबईने या षटकात १४ रन्स काढताना विजयाचे पारडे आपल्याकडे झुकवले.
कर्णधार हरभजन सिंगने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अतिशय आक्रमक पद्धतीने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. पहिल्याच षटकात फक्त २ धावा हरभजनने दिल्या पार्थिव पटेल आणि शिखर धवन यांनी ३७ रन्सची दमदार सलामी नोंदवली. आर. पी. सिंगने सहाव्या षटकात पार्थिवला (१९) बाद केले. त्यानंतर डेक्कन चार्जर्सच्या धावफलकाला स्थर्यच लाभले नाही. जीन पॉल डय़ुमिनी याने एक बाजू सावरताना २४ चेंडूंत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. परंतु दुसऱ्या बाजूचे बाकीचे फलंदाज एकेक करून तंबूत परतले. त्यामुळे १८.४ षटकांत डेक्कनला जेमतेम १०० धावा करता आल्या.