मायकल क्लार्कचं पहिलं वहिलं त्रिशतक

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कनं शानदार ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही पहिली-वहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे.

Updated: Jan 5, 2012, 09:25 AM IST

www.24taas.com ,सिडनी

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कनं शानदार ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही पहिली-वहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. त्याचप्रमाणे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. मायकल क्लार्कने ४३५ ब्लॉसचा सामना करत पहिलं वहिलं त्रिशतक झळकावंल.

 

ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला धुतले असतानाच माईक हसीनेही तोच कित्ता गिरवला. त्याने शतक झळकावून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला.
 

ज्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १३ बॅटमन्स बाद झाले, त्याच खेळपट्टीवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त अवघा एकच बॅटमन्स बाद झाला. सिडनी मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग या आजी-माजी कर्णधार; तसेच माईक हसीच्या जोरदार खेळाने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावरही दुसऱ्याच दिवशी मजबूत पकड मिळविली.  ही पकड तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

 

 

रिकी पॉंटिंगचे (१३४) शतक आणि त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या २८८ रन्सच्या भागीदारीने  टीम इंडियाच्या बॉलर्सच्या उणिवा साफ उघड्या पडल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पॉंटिंग आणि क्‍लार्क या आक्रमक शैलीच्या फलंदाजांनी लौकिकाला साजेसा खेळ करताना ऑस्ट्रेलियन संघाची सामन्यावरील पकड मजबूत केली. दिवसभरातील ९०  षटकांच्या खेळात ३६६ रन्स काढल्या गेल्या आणि  टीम इंडियाच्या  बॉलर्सना केवळ रिकी पॉंटिंगला बाद करण्यात यश आले. अर्थात, तोपर्यंत क्‍लार्क-पॉंटिंग जोडीने  टीम इंडियाचे सामन्यातील अस्तित्वच जणू संपुष्टात आणले होते.

 

 

पॉंटिंग बाद झाल्यावर खेळायला आलेल्या माईक हसीनेदेखील (नाबाद ५२) अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या बॉलर्सच्या अपयशावर मीठच चोळले. दुसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने ४  बाद ४८२ धावांची मजल मारताना २९१ रन्सची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाच्या या आघाडीने दुसऱ्याच दिवशी जणू भारताच्या सलग दुसऱ्या पराभवाची नांदी दिली आहे.

 

ऑस्ट्रेलिया -  624/4 (155.0 ov)

टीम इंडिया (पहिला डाव) -  191