www.24taas.com, मुंबई
क्रिकेटचा महानायक... रेकॉर्ड्सचा अनभिज्ञ सम्राट... रनमशिन... क्रिकेटदैवत....मास्टर ब्लास्टर अशा एक ना अनेक नावांनी संपूर्ण जग ज्याला ओळखत तो सचिन...सचिन तेंडुलकर..
या नावासमोर क्रिकेटचे असंख्य रेकॉर्ड्स आहेत...पण फक्त रेकॉर्डपूरतच हे नाव मर्यादित नसून या नावाची अजून बरीच विशेषणं आहेत... एखाद्या माणसावर देव किती गुणांचा वर्षाव करु शकतो याचं कदाचित सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर..
१) एकनिष्ठ सचिन
वय 16... मिसरुडही न फुटलेला मुलगा...उभा ठाकला जगातल्या सर्वात कठीण बॉलिंग अटॅक समोर...त्या दिवशी जो उभा राहिला तो आज पर्यंत अढळ उभाच आहे... ध्येयाशी किती एकनिष्ठ असावं हे सांगण्यासाठी हा 23 वर्षांचा प्रवास पुरावा आहे. आपण सर्वश्रेष्ठ आहोत, असा विचार त्याच्या मनात कधीच आला नाही...
उलट प्रत्येक वेळी नवनव्या आव्हानांना नव्या जोशात सामोरं जाणारा हा लढवय्या... 23 वर्षांपूर्वी सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं पण सचिनचं क्रिकेटवरचं प्रेम त्याहीपेक्षा जुनं आहे. वड जितका जुना त्याची मुळं जमिनीत तितकीच खोल जातात आणि तो जास्त भक्कम होतो तसंच काहीसं सचिन आणि क्रिकेटच झालंय.. आणि हे सगळं साधलं सचिन क्रिकेटशी एकनिष्ठ राहिला म्हणूनच.......
२) आदर्श शिष्य
सचिन पुढे आज संपूर्ण जग नतमस्तक होतं ते फक्त त्याच्या क्रिकेटमधल्या खेळीमुळेच नव्हे तर त्याच्यातला माणूसही तितकाच चांगला आहे. बॅटिंगचे सर्व रेकॉर्डस... आभाळासारखं करिअर... समुद्रासारखं वैभव... लोकांनी दिलेलं देवत्व.. अनंत पुरस्कारांचा धनी असलेल्या सचिनसाठी आजही सगळ्यात मौल्यवान आहेत ते त्याचे गुरू कोच रमाकांत आचरेकरांनी दिलेली एक-एक रुपयांची 12 नाणी.... एकलव्याची गोष्ट ज्याला माहीत आहे, त्याला या 12 नाण्यांचं महत्त्व वेगळं सांगायला नको....
आचरेकर सरांकडून जास्तीत जास्त शिकता यावं म्हणून सचिननं प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं. किर्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहचल्यावरही जो आपल्या गुरुला विसरला नाही त्याचंच नाव आहे सचिन.....
३) आत्मविश्वास
सचिननं आज ज्या स्थानी पोहोचलाय, ते गाठणं सोपं नक्कीच नव्हतं. सचिननं त्याची खेळी वैविध्यानं भरुन टाकली. सचिनच्या भात्यात अनेक स्ट्रोक्स आहेत. त्या स्ट्रोक्स आणि अस्त्रांचा सचिन योग्य वेळी वापर करतो. बॉलर्सवर ऍटॅक करणा-या सचिनमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसतो.
सचिनच्या करिअरमध्ये अनेक बॅड पॅचेस आले, दुखापती, बोच-या टीका अशा असंख्य अडचणींना सचिन आत्मविश्वासानं सामोरा गेला. अनेक दुखापतींचा सेसेमिरा मागे लागूनही फक्त जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर सचिन मैदानात भक्कम पाय रोवून आहे.
४) अभ्यासू
परफेकशन हे सचिनचं दुसरं नाव....अर्थात त्यासाठी कारणीभूत आहे सचिनची अभ्यासू वृत्ती. सचिननं प्रत्येक इनिंगचा, प्रत्येक स्ट्रोकचा आणि केलेल्या प्रत्येक चुकीचासुद्धा अभ्यास केला.
शुन्यावर बाद झाला तरी आणि सेंच्युरी झळकावली तरी सचिन त्याच अभ्यासूवृत्तीनं इंनिगचं विश्लेषण करतो. म्हणूनच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट यावर सचिनचा जबरदस्त विश्वास आहे.
५) संयमी
संयम म्हणजे काय, ते सचिनक