पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा आणि शतकांचा....

ऍडलेड टेस्टमध्ये पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर ३ विकेट गमावून ३३५ रन्स केले. क्लार्क आणि पॉन्टिंगची नॉट आऊट सेंच्युरी, दोघांनी चौथ्या विकेट्साठी केलेली २५१ रन्सची पार्टनरशिप यामुळं पहिल्या दिवशी टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे.

Updated: Jan 24, 2012, 01:38 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

ऍडलेड टेस्टमध्ये पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर ३ विकेट गमावून ३३५ रन्स केले. क्लार्क आणि पॉन्टिंगची नॉट आऊट सेंच्युरी, दोघांनी चौथ्या विकेट्साठी केलेली २५१ रन्सची पार्टनरशिप यामुळं पहिल्या दिवशी टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. कांगारूंनी टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं.

 

त्यानंतर मात्र कॅप्टन क्लार्क आणि माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं भारतीय बॉलर्सला कोणतच यश मिळू दिलं नाही. दोघांनी भारतीय बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेतला. क्लार्क. १४० रन्सवर तर पॉन्टिंग १३७ रन्सवर नॉट आऊट आहेत. भारताकडून अश्विननं २ तर झहीरनं एक विकेट घेतली.

 

रिकी पॉण्टिंगने पुन्हा एकदा टीम इंडिया विरूद्ध शतक ठोकलं आहे, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं ४१वं शतक ठोकलं आहे. त्याने त्याच्या या संपूर्ण खेळीमध्ये शानदार १२ फोरच्या साह्याने शतकी खेळी केली आहे. तर त्याच सोबत पुन्हा एकदा कॅप्टन्स इनिंग खेळत मायकल क्लार्क याने देखील शतकं काढलं आहे त्याने त्याच्या खेळीत १४ फोर आणि एका षटकाच्या जोरावर शतकं ठोकलं आहे.

 

रिकी पॉण्टिंगने या कसोटी सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश करत आपल्या टीमला सावरलं आहे. रिकी पॉण्टिंगने १३००० हजार रन्सचा टप्पा देखील गाठला आहे, कसोटी क्रिकेटमध्ये तो १३००० हजार रन्स करणारा तिसरा बॅट्समन ठरला आहे. तसचं चहापानापर्यंत त्यांनी ९१ रन्सची मजल मारली आहे. तर त्याच्यासोबत असणाऱ्या क्लार्कने देखील अर्धशतकी खेळी केली आहे.

 

अँडलेडच्या ओव्हलवर चौथ्या आणि शेवटच्या टेस्टच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या खराब सुरवातीनंतर कॅप्टन मायकल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पॉंन्टिंगनं आपली हाफ सेंच्युरी पूर्ण करत कांगारुंचा स्कोअर २०० रन्सच्या पुढे नेला आहे.

 

ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला व्हाईट व्हॉश देण्यासाठी आजपासून अँडलेड टेस्टमध्ये सज्ज झाली आहे. पण आज चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फंलदाजी सुरवातीलाच गडबडली होती. लचं पर्यंत ऑसींनी आपल्या ३ विकेट गमावल्या होत्या. त्यात दोन विकेट आर. अश्विनने घेतली तर एक विकेट झहीर खानने मिळवली.

 

लंचपर्यंत ऑसी ९८ रन्सच्या मोबदल्यात तीन विकेट गमवल्या तरी आता भारतासमोर ऑसी कॅप्टन मायकल क्लार्क आणि पॉण्टिंग यांना झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे. पॉण्टिंग हा ४३ रन्सवर आहे तर या सीरीजमध्ये फॉर्ममध्ये असलेला मायकल क्लार्क हा पॉण्टिंगच्या साथीला आहे.   अँडलेडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये सुरुवातीच्या पडझडीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव मात्र सावरला आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

 

पण, पर्थ टेस्टमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरचा अडसर झहीर खाननं लगेचच दूर केला. त्यानंतर अश्विननं शॉन मार्शचा काटा काढला. वॉर्नर आणि मार्श झटपट तंबूत तर कोवेननं याला देखील अश्विन लक्ष्मणकरवी झेलबाद करीत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोवेन परतल्यानंतर पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांनी  कांगारूंचा डाव सावरला आहे

 

ऑस्ट्रेलिया –  (पहिला दिवस)  355/3

ओव्हर्स – 90. 0