ख्रिस गेल बरसला, पुणे वॉरियर्स गारद

पावसानंतर ख्रिस गेलच्या वादळी फटकेबाजीमुळे पुणे वॉरियर्सची घरच्या मैदानावर वाताहत झाली. गेलच्या ५१ चेंडूंतील ५७ तसेच तिलकरत्ने दिलशानच्या ५३ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंर्जस बंगळूर संघाने वॉरियर्ससमोर विजयासाठी १७४ रन्सचे आव्हान उभे केले. मात्र, पुण्याचे फलंदाज हे आव्हान पेलू शकले नाही.

Updated: May 12, 2012, 08:31 AM IST

www.24taas.com, पुणे 

पावसानंतर ख्रिस गेलच्या वादळी फटकेबाजीमुळे पुणे वॉरियर्सची घरच्या मैदानावर वाताहत झाली. गेलच्या ५१ चेंडूंतील ५७ तसेच तिलकरत्ने दिलशानच्या ५३ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंर्जस बंगळूर संघाने वॉरियर्ससमोर विजयासाठी १७४ रन्सचे आव्हान उभे केले. मात्र,  पुण्याचे फलंदाज हे आव्हान पेलू शकले नाही.

पुणे वॉरियर्स  ९ बाद १३८ रन्सपर्यंत मजल मारू शकला.  रॉयल चॅलेंर्जसने  या विजयामुळे आपले गुणतालिकेत तिसरे स्थानही पटकावले. १७५ रन्सचे आव्हान असलेला पुण्याची अवस्था १६ व्या षटकाखेर ७ बाद १0९ अशी झाली होती. तेथेच त्यांचा पराभवही नक्की झाला होता. दादा सौरव गांगुली ऐवजी स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालीही पुण्याने फ्लॉप शोची मालिका चालू ठेवली. रॉबिन उथप्पा (२५ चेंडूत ३८) आणि मुजुमदार (२६ चेंडूत ३१) वगळता बंगळूरच्या गोलंदाजीसमोर इतरांची भंबेरी उडाली.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करणार्‍या पुणे संघाला गेलने चांगलाच तडाखा दिला. त्याने ३१ चेंडूंत ५७ रन्सची आक्रमक खेळी करताना तब्बल ६ षटकार व ३ चौकारांची आतषबाजी केली. दिलशाननेही ४४ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५३ रन्स केल्या. त्या खालोखाल सौरभ तिवारीने ३0 चेंडूंत ३४ रन्स केल्या. यात १ षटकार व ३ चौकारांचा समावेश आहे.

गेल-दिलशान या सलामी जोडीने ८.३ षटकांत ८0 रन्सची वेगवान भागीदारी करून वॉरियर्सच्या पोटात गोळा आणला होता. गेलचा धडाका बघता तो सहजपणे शतक पूर्ण करणार व आरसीबी दोनशेपार मजल मारणार, असे वाटत होते. मात्र अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने त्याला बाद करून वॉरियर्सला मोठा दिलासा दिला. गेल बाद झाल्यावर आरसीबीची धावगती मंदावली. प्रभारी कर्णधार विराट कोहलीला १२ चेंडूंत केवळ ९ रन्स केल्या