एशिया कपमध्ये इंडिया झुंजणार लंकेसोबत

भारत आणि श्रीलंका यांच्यातली एशिया कपची मॅच शेर-ए-बांगला स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाची कामगिरी वर्ल्ड कपनंतर समाधानकारक झाली नाही. त्यामुळे एशिया कपमध्ये भारतीय टीम कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल.

Updated: Mar 13, 2012, 12:44 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

भारत आणि श्रीलंका यांच्यातली एशिया कपची मॅच शेर-ए-बांगला स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाची कामगिरी वर्ल्ड कपनंतर समाधानकारक झाली नाही. त्यामुळे एशिया कपमध्ये भारतीय टीम कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल.

 

टीम इंडियाच्या मिशन एशिया कपला श्रीलंकेविरुद्धच्या मॅचनं सुरुवात होणार. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय टीमला केवळ पराभवाचचं तोडं पाहायला मिळालं आहे. टीममधील अंतर्गत वादाचा परिणामही टीम इंडियाच्या कामगिरीवर झालेला दिसला. आता, टीम मधील वाद मागे टाकत मैदानावर नव्या जोशानं धोनी अँड कंपनीला उतरावं लागणार आहे. वीरेंद्र सेहवाग खेळत नसल्यानं ओपनिंगची जबाबदारी सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरवर असणार आहे.

 

सचिनच्या कामगिरीवर पुन्हा एकदा अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागणार आहे. त्याच्या महासेंच्युरीची प्रतीक्षा क्रिकेटप्रेमींना असणार आहे. इनफॉर्म बॅट्समन विराट कोहली धोनीचा या टुर्नामेंटमध्येही ट्रम्प कार्ड ठरणार आहे. रोहित शर्मा, सुरेश रैना सीबी सीरिजमध्ये सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांना आपल्या बॅटची जादू या टुर्नामेंटमध्ये दाखवावी लागणार आहे. तसंच महेंद्रसिंग धोनीचा फॉर्मही भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.

 

भारताला जिंकून देण्यासाठी पठाण ब्रदर्सनाही जबरदस्त कामगिरी करावी लागले. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजावर स्पिन डिपार्टमेंटची जबाबदारी असेल. तर विनय कुमार, प्रवीण कुमारला आपल्या तेज बॉलिंगनं लंकन बॅट्समनना रोखण्याच आव्हान असेल. लंकेच्या टीमची कामगिरी चांगली होते आहे. तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा हे तिन्ही बॅट्समन जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. दिनेश चंडिमल हा युवा बॅट्समनही चमकदार कामगिरी करतो आहे.  आता टीम इंडिया सलामीच्या मॅचमध्ये बाजी मारते का? याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.