इंग्लंडची हाराकिरी, इंडियाची विजयी स्वारी

इंडियाने इंग्लंडच्या विरूद्ध पहिली वनडे 126 धावांनी सहज खिशात टाकली. हैदराबाद वन-डेत टीम इंडियाच्या बॅट्समननी कमाल केली. इंग्लंड दौ-यात टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच घसरगुंडी झाली. आणि त्यामुळे बॅट्समनवरच सर्वाधिक टीका झाली होती. मायभूमीत टीम इंडियाच्या बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. आणि भारतानं पहिल्याच मॅचमध्ये 300 चा आकडा पार केला.

Updated: Oct 15, 2011, 03:44 PM IST

झी 24 तास वेब टीम, हैद्राबाद

 

इंडियाने इंग्लंडच्या विरूद्ध पहिली वनडे 126 धावांनी सहज खिशात टाकली. हैदराबाद वन-डेत टीम इंडियाच्या बॅट्समननी कमाल केली.  इंग्लंड दौ-यात टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच घसरगुंडी झाली. आणि त्यामुळे बॅट्समनवरच सर्वाधिक टीका झाली होती. मायभूमीत टीम इंडियाच्या बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. आणि भारतानं पहिल्याच मॅचमध्ये 300 चा आकडा पार केला.

 

[caption id="attachment_2366" align="alignleft" width="266" caption="टिम इंडिया विजयी"][/caption]

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सने चांगली कामगिरी केली. खास करून युवा फिरकी बॉलर्सने प्रभावशाली कामगिरी केली आणि फिरकी हेच टीम इंडियचं प्रमुख अस्त्र असल्याचं पुन्हा एकदा सिध्द केलं. खासकरून दिग्गज बॉलर्सच्या गैरहजेरीत युवा बॉलर्सची कामगिरी ही कौतुकास्पद ठरली आहे.

 

झहीर खान, हरभजन सिंग आणि ईशांत शर्मा या प्रमुख बॉलर्सच्या गैरहजेरीत टीम इंडियाच्या युवा बॉलर्सने आपली जबाबदारी चोख बजावली. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाच्या युवा बॉलर्सने इंग्लिश बॅट्समनची चांगलीच दाणादाण उडवून दिली. धोनीने आपल्या सहका-यांसमावेत इंग्लंडसमोर विशाल 301 रन्सच आव्हान ठेवण्याच काम चोख बजावलं. यानंतर परिक्षा होती ती टीम इंडियाच्या बॉलर्सची.

 

टीम इंडियाच्या बॉलर्सनेदेखील आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ठेवत आपली भूमिका चांगल्या रितीने बजावली. तिस-याच ओव्हर्समध्ये इंग्लंडची ओपनिंग जोडी फोडण्यात टीम इंडियाचा प्रमुख बॉलर्स प्रवीण कुमारला यश आलं. यानंतर इंग्लंडचा एक-एक बॅट्समन फसत गेला. धोकादायक ठरू पाहत असलेल्या कॅप्टन ऍलिस्टर कूकला आऊट करण्यात रवींद्र जडेजाला यश आलं. जडेजा आणि अश्विनने इंग्लंडची टॉप आणि मिडल ऑर्डर उध्वस्त करून टाकली.

 

रवींद्र जडेजाने 7 ओव्हर्समध्ये 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये जडेजाने 4.85 च्या इकॉनॉमीने 34 रन्स दिल्या. तर आर. अश्विननेदेखील 8.1 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स घेतल्या. अश्विनने 4.28 च्या इकॉनॉमीने 35 रन्स दिल्या.

 

तर उरली-सुरली कसर फास्ट बॉलर उमेश यादवने पुरी केली. इंग्लडच्या टीमला 174 रन्सवरच ऑल आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आल. याच युवा बॉलर्सना इंग्लंड दौ-यावर खराब कामिगिरी केल्यामुळे टीकेला सामोरे जाव लागत होत. मात्र, याच युवा बॉलर्सने मायदेशात चांगली कामगिरी करून आपल्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे धोनीने कॅप्टनस इनिंग खेळून टीम इंडियाला विजयाचा समीप नेलं. त्याचप्रमाणे ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरीसुद्धा तोच ठरला.