www.24taas.com, चेन्नई
इंडियन प्रिमियर लीगच्या पाचव्या सत्राचा उदघाटन सोहळा धुमधडाक्यात झाला. यावेळी बॉलिवूड अभिनेता दबंग सलमान खान ढिंक चिकासह अनेक गाण्यांवर नाचत धमाल केली. छम्मक छल्लो करिना कपूरसाठी चक्क २० लाख रूपये मोजण्यात आले.
आयपीएलचा प्रारंभ बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केला आहे. बीग बी यांनी प्रसून जोशी यांच्या कवितांचे वाचन करुन आयपीएलचा शुभारंभ केला. बॉलिवूड अभिनेत्रीकरिना कपूर छम्मक छल्लो गाण्यावर थिरकली. तसेच तिने एजंट विनोदच्या 'ओ मेरी जान' आणि 'दिल मेरा मुफ्त का' या मॉडर्न मुज-यावर प्रेक्षकांना ताल धरायला लावला. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा डॉनच्या गाण्यांवर थिरकली.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा संघ मंचावर आला. यावेळी प्रियंकाने धोनीला कोणता संघ सर्वोत्तम आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर धोनी म्हणाला, जो चांगली मेहनत करेल तो जिंकेल, असे सावध उत्तर दिले. यावेळी प्रेक्षकांनी धमाल केली. सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे केटी पेरी ठरली. ती पहिल्यांदाच भारतात आली आहे.
आयपीएलच्या पाचव्या सत्राची सुरवात चार एप्रिल पासून होणार आहे. आणि २७ पर्यंत आयपीएलची मजा घेता येणार आहे. या टुर्नामेंटमध्ये ९ टीम सहभागी होणार आहे. १२ वेगवेगळ्या ठिकाणी ७६ मॅच खेळविण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याला नऊही टीमचे कॅप्टन असणार आहेत. बुधवार पासून या टूर्नामेंटला सुरवात होणार आहे. ४ एप्रिलला पहिली मॅच होणार आहे. मागील वर्षाचे चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स आणि रनर अप मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला t-20 सामना होणार आहे.