अटीतटीच्या लढतीत लंकेची कांगारुंवर मात

होबार्ट वन-डेमध्ये श्रीलंकेनं अटीतटीच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्सनं पराभव केला. या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये लंकेनं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

Updated: Feb 24, 2012, 05:08 PM IST

www.24taas.com, होबार्ट

 

होबार्ट वन-डेमध्ये श्रीलंकेनं अटीतटीच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्सनं पराभव केला. या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये लंकेनं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. लंकन टीम जिंकल्यामुळे टीम इंडियाचा सीबी सीरिजची फायनल गाठण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

 

आता फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला आपल्या उर्वरित दोन्ही मॅचेस जिंकाव्याच लागणार आहेत.  दरम्यान, ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं 281 रन्सचं टार्गेट पार करण्यात लंकनं बॅट्समनला यश आलं. दिनेश चांदिमलच्या 80 रन्सच्या आणि महेला जयवर्धनेच्या 85 रन्सच्या इनिंगमुळेच लंकेला ऑस्ट्रेलियावर  मात करण्यात यश आलं. तर ऑस्ट्रेलियाकडून पीटर फॉरेस्टनं झळकावलेली पहिली-वहिली सेंच्युरी व्यर्थ गेली.

 

ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेदरम्यान होबार्ट येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर विजयासाठी २८१ रन्सचे टार्गेट ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर मॅथ्यू वेड अवघ्या पाच तर वॉर्नर सात  रन्स करून बाद झाला. फॉरेस्टने मात्र दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने १३८ चेडूंमध्ये १०४ रन्स  केल्या, कर्णधार मायकेल क्‍लार्कने अर्धशतक झळकावताना ७२ रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २८० रन्स  केल्या. श्रीलंकेकडून मॅथ्यूने दोन तर मलिंगा, महारुफ, केक्कारा, हेर्थने प्रत्येकी एक गडी बाद केला.